हलक्या व मध्यम पावसा मुले पीक संकटात !

Share:

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावा होत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर ज्वारी कणसाच्या अवस्थेत आहे. खरिपातील कापूस, तूर पिकांची काढणी सुरू आहे. फळबागामध्ये द्राक्षे, डाळिंब, अंजीर ही फळपिके काढणी अवस्थेत आहेत. आंबा फळपीक मोहोराच्या अवस्थेत आहे.
मात्र ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. दिवसभर ढगाळ असले, तरी दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.
पावसामुळे ऊसतोडणी प्रभावित झाली असून, गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. तर हरभरा आणि गहू पिकावर कीड-रोग वाढण्याची शक्यता आहे. पाऊस जास्त पढल्याने त्याचा परिणाम हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षे, आंबा पिकांवर होणार असून रोग, किडीचा होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरण व अधूनमधून तुटणारे पावसाचे थेंब शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहेत. तुरीची मळणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे.

Share: