मध्यप्रदेश सरकार देणार शेतकऱ्यांना पेन्शन

28
0
Share:

मध्यप्रदेश सरकार शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आत्ता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे.राज्यातील ६० वर्षावरील मध्यम आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दर महिना एक हजार रुपये पेन्शन देणार आहे त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ही योजना संपूर्ण राज्यभर लागू होईल असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणूका जस जसे जवळ येत आहे तस तसा शेतकऱ्यांवर विविध योजनांचा पाऊस राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे मध्यप्रदेश आत्ताच निवडणूक झाल्या होत्या आणि तिथे सध्या काँग्रेस चं सरकार आहे म्हणजे सत्तेतले असो वा विरोधक सगळे आत्ता शेतकऱ्याची काळजी घेत आहे.
मध्यप्रदेश मध्ये या संपूर्ण योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याची आकडेवारी ही ६० लाख इतकी आहे आणि ही योजना राबविणे म्हणजे कित्येक महिने उलटणार पण या घोषणांची आत्ताच का घाई? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरचं काही दिवसात कळेल.

Share: