Maharashtra election 2019: शेती शाश्वत करणार, भाजपचा जाहीरनाम्यात आश्वासन

20
0
Share:

शेती शाश्वत करणार, भाजपचा जाहीरनाम्यात आश्वासन

आगामी पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार आणि सोबतच निसर्गावर अवलंबून असलेली शेती शाश्वत शेतीकडे नेणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये शेती, शिक्षण, रस्ते. आरोग्य आदी विषयावर अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील भाजपने जाहीर केले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे

-दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचणार आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार.
-कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार
नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार
-शेतीला बारा तास वीज पुरवठा करणार,
-१,००० मेगावॅटचे पवनउर्जा प्रकल्प, १,५०० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, कचरापासून वीजनिर्मिती करणार,
-गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान देणार,
-बिगर कर्जदार शेतक यांनाही पीक विमा संरक्षण.
-शेतीकर्ज सवलतीच्या दराने कायमस्वरूपी मिळणार.
-इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देणार.
-‘ई-नाम’द्वारे शेतीमालाला जास्तीचा दर देणार.
-मासेमारीसाठी कमी दरात कर्ज व विक्रीसाठी आधुनिक सुविधा.
-एक कोटी लोकांना रोजगार देणार.
-राज्यातील ८ शहरांत नवीन विमानतळ सुरू होणार,
-शेतीमाल निर्यातीसाठी विमानसेवा विकसित होणार.
-पाचवीपासून शेतीवर आधारीत अभ्यासक्रम,
-राज्यात नव्या आयआयटी, आयआयएम, एम्स संस्था उभारणार.
-एक कोटी महिलांना बचतगटाशी जोडून रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करणार.,
-प्रत्येक बेघराला २०२२ पर्यत घर आणि प्रत्येकाला पिण्याचे पाणी देणार.
-राज्यातील सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार,
-मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेच्या माध्यमातून सर्व वस्त्या बारमाही रस्त्यांनी जोडणार, त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसरा टण्यातून ३० हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बनवणार,
-शेतक-यासाठी शेतात जाणारा रस्ता पाणंद रस्ता म्हणून मजबूत करणार
राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनासाठी धडक मोहीम राबवून पुनर्वसनाचा काम लवकर पूर्ण करणार

Share: