Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

5
0
Share:

 

मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Lockdown Extension) आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. नुकतंच याबबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे.

लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार पार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला (Maharashtra Corona Cases) आहे. राज्यात आज 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक 67 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 1 हजार 606 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील  एकूण रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 22 हजार 479 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत दिवसभरात 884 नवे रुग्ण आढळले आहे. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share: