ओल्या कचऱ्यापासून शिराळा येथे खत निर्मिती

88
0
Share:

कचरा वर्गीकरणाबरोबर घरच्या घरीच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यास आम्ही सर्व नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे. सर्वांना निसर्ग पेटीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ओला कचरा वाळवून त्याचे खत घरीच तयार होऊ लागले आहे.
– सुनंदा सोनटक्के, नगराध्यक्षा
नगर पंचायतीने “स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा” ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याचे काम सुरू केले आहे. कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी, सायकलींचा वापर केला जातो. कचरा उचलताना ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जाते. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आश्रमशाळा येथे ओल्या कचऱ्यासाठी १५ आणि काच, चप्पल, कपडे, प्लॅस्टिक अशा सुक्‍या कचऱ्यासाठी ६ अशी एकूण २१ युनिट तयार करण्यात आली आहेत. सुक्‍या कचऱ्याचे या ठिकाणी वर्गीकरण केले जाते. नाग स्टेडियम येथे ओल्या कचऱ्यासाठी २४ युनिट उभारण्यात आली आहेत.

नागरिकांनी ओला, सुका, ई-कचरा वर्गीकरण करावे यासाठी नगरपंचायतीने शाळा, महाविद्यालये, प्रभागनिहाय जनजागृती केली आहे. महिलांसाठी खेळ, पैठणीचा कार्यक्रम घेऊन प्रबोधन केले आहे.

Share: