नोकरभरतिच्या नियुक्तीपत्र मिळाली नाही ,आजाद मैदानात मराठा तरुणांचा आंदोलन.

19
0
Share:

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागात नोकरभरती झाली. नोकरभरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या. मात्र नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

भाजप सरकारने त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं. या आंदोलनाविरोधात अनेक संघटना हायकोर्टात गेल्या. मात्र मुंबई हायकोर्टाने हे आरक्षण कायदेशीर ठरवून कायम केलं. त्यानंतर नोकरभरती सुरू झाली. जवळपास 55 सरकारी विभागात नोकर भरती सुरु झाली. मात्र, त्यांना नियुक्ती पत्र दिलं गेलं नाही. आज नियुक्ती पत्र मिळेल, उद्या मिळेल या आशेवर मराठा समाजातील अनेक तरुण यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र 7 महिने उलटल्यानंतरही त्यांना नियुक्ती पत्र मिळालं नाही. त्यामुळे मराठी समाजाचे तरुण आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत.

या आंदोलनकर्त्यांची आज (3 फेब्रुवारी) खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आंदोलनकर्त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि वकील यांच्याशी चर्चा केली. यानंतर आंदोलनकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या सोयीप्रमाणे संध्याकाळी बैठकीही आयोजन केलं होतं.

तर दुपारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. या सरकारला मराठा तरुणाचे प्रश्न सोडवायचे नाहीत. आघाडी सरकार मराठा तरुणांच्या प्रश्नावर चालढकल करत आहे. आम्हाला लाली पॉप देत आहे. आज सरकारने जर मार्ग काढला नाहीत तर मराठा काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, असे नितेश राणे म्हणाले.

आज मंत्रालयात मराठा तरुणांच्या या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीत आंदोलनकर्ते होते. पण या बैठकीत आंदोलन कर्त्यांचं समाधान झालेलं नाही. दरम्यान आंदोलनकर्त्यांचं समाधान न झाल्याने आता हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता  आहे.

Share: