Maratha Reservation: १ व २ डिसेंबर महाराष्ट्र भरात महावितरण कार्यालयासमोर निदर्शने व ८ डिसेंबरला मुंबईवर मराठ्यांचा वाहन मार्च

20
0
Share:

पुणे: आज मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय निर्णायक बैठक, पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे.

महावितरण मध्ये उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरण ने घेतल्याने मराठा समाज येत्या १ व २ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्या नुसार अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

२०१४ ते २०२० प्रलंबित शासकीय नियुक्ती उमेदवार प्रश्र्न , शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुपर न्युमररी , अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे , असे अनेक प्रश्न शासनाने सोडविले नसल्याने मराठा तरुण आक्रमक आहेत.

या बैठकीत दिल्ली येथून छत्रपती संभाजीराजे , ॲड दिलीप तौर , औरंगाबाद एम एम तांबे , अहमदनगर बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला.

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, राजेंद्र कुंजीर, विरेंद्र पवार – मुंबई , संजीव भोर अहमदनगर , अंकुश कदम- नविमुंबई , विनोद साबळे – रायगड , राजन घाग – मुंबई , तुषार जगताप , गणेश कदम – नाशिक ,दिलीप पाटील-कोल्हापुर , माऊली पवार- रवि मोहीते – सोलापुर , गंगाधर काळकुटे -बिड , रवि सोडतकर- औरंगाबाद , डॉ सजय पाटील- सांगली , रूपेश मांजरेकर – मुंबई , किशोर मोरे‌, दशहरी चव्हाण तसेच अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share: