Mathadi Worker Strike| माथाडी कामगारांच्या भवितव्यसाठी 14 डिसेंबर रोजी  संप!

18
0
Share:
नवी मुंबई: आघाडी सरकारला महाराष्ट्र मध्ये एक वर्ष पूर्ण झाली असून माथाडी कामगारांना एकही प्रश्न मार्गिस लागलेले नाही .कोरोना काळात मुंबई आणि उपनगरात नागरिकांना अन्न धण्याच्या तुटवडा होऊ नये यासाठी  माथाडी कामगारने पूर्ण सेवा दिल्या आणि कामगारांना कोरोनाची लागण झाली .राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारचा सहयोग मिळाली नाही तसेच माथाडी कामगारांच्या राज्य सरकार व संबंधितांकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याकडे लक्ष वेधण्यासाठी तमाम माथाडी कामगारांच्या वतीने 14 डिसेंबर रोजी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.एपीएमसी माथाडी भवन मध्ये ह्या निर्णय घेण्यात आला असून बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील,आमदार शशिकांत शिंदे आणि माथाडी कामगार उपास्थित होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने हा संप होणार आहे. पाचही बाजारांतील सर्व व्यवहार हा दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे. माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडवण्याबाबत अनेक निवेदने राज्य सरकारकडे सादर केली, परंतु त्याचा परिणाम न झाल्याने लाक्षणिक संप पुकारणे भाग पडले असल्याचेही माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. माथाडी कायद्यात पोलिस संरक्षणाची तरतूद करणे, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी समिती स्थापन करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी, तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, आदी अनेक प्रश्न राज्य सरकार व संबंधिताकडे प्रलंबित आहेत.हे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा पुढील आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही माथाडी कामगार नेत्यांनी दिला.
Share: