मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून थकलेल्या सेसची वसुली; कोटी रुपयांचा सेस भरून रेकॉर्ड तर इतर मार्केटचा सेस पाहण्यासाठी सविस्तर बातमी वाचा
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सेस थकबाकी भाजीपाला मार्केटने भरल्याने भाजीपाला मार्केटमधून रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटमधून बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी आली आहे. मार्च महिन्यापर्यंत जवळपास ७० लाख रुपये असलेली थकबाकी बाजार समितीकडून वसूलण्यात आली आहे. शिवाय उर्वरित १ कोटी रक्कम देखील चालू महिन्यात वसूलण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सेस नोंदीत पुन्हा एकदा भाजीपाला मार्केटचा दबदबा राहणार आहे.
शिवाय थकबाकी असलेल्या १ कोटी रुपयांच्या यादीत मोठमोठे व्यापारी असल्याने यांच्याकडून हा सेस भरणा होणार हे निश्चित असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. APMC मधील विविध मार्केटकडून मागील महिन्यात भाजीपाला मार्केट -1 कोटी   68 लाख 3880, फळ मार्केट- 74 लाख 07 हजार, मसाला मार्केट - 1 कोटी 44 लाख, धान्य मार्केट-1 कोटी 71 लाख 82 हजार व कांदा बटाटा मार्केट - 65 लाख 59 हजार सेस वसुली झाली आहे.