मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील भाज्यांचे बाजारभाव
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमधील भाज्यांचे बाजारभाव
- एपीएमसी भाजी मार्केटमध्ये एकूण ६३० गाड्यांची आवक
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये शेतमालाच्या ६३० गाड्या आल्या असून कोबी, फ्लावर या भाज्या ८ ते १० रुपये किलोने   विकल्या जात आहेत. भरमसाठ उत्पादनामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच टोमॅटो १० रुपये , मिरची ३०,काकडी ३० रुपये , पालक १०, कोथिंबीर १५ रुपये , मेथी १०,कांदापात १० रुपये प्रतिजुडी ,या दरात भाज्यांची विक्री होत आहे.. बाजार आवारात वाटाणा २४ रुपये ,वांगी २० रुपये ,शिमला ४० ,भेंडी ५० ,गवार ६०,कारले २५ रुपये हा भाज्यांचा दर आहे.
ब्युरो रिपोर्ट APMC NEWS