मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये चहा पावडर 14 हजार रुपये प्रति किलो.
मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये चहा पावडर 14 हजार रुपये प्रति किलो.    
 
नवी मुंबई : तुम्हाला चहा आवडतो का? अर्थातच चहा हा सगळ्यनांनाच आवडतो. चहाचे अनेक फायदे आणि तोटे देखील आहेत. पण चहामध्ये अनेकांचा जीव अडकलेला असतो. आपला दिवस आनंदी आणि फ्रेश जाण्यासाठी सकाळचा चहा हा लागतोच. टपरी वरचा चहा हा १० ते १५ रुपयात हॉटेल मध्ये ३० ते ४० पण कधी विचार केला आहे का आपण जो चहा पितो   आपल्या घरात साधारण   सोसायटी , ताज , लिप्टन   हे   नाव तर आपल्याला माहितीच आहेत.   तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत चहापावडरचे थोदे वेगळे प्रकार   मुंबई APMC मसाले मार्केट मध्ये चहापावडरचे १०० प्रकार आहेत. वॅनिला टी ,चॉकलेटे टी ,हिबिसकस ग्रीन टी ,माओ फेंग ग्रीन टी ,किवी डिलाईट ,मिक्स व्हेरी ,ओरेंज सिनामोन ,एनर्जी ग्रीन ती ,सॅफ्रोन कावा ,काश्मिरी कावा ,सिल्वर स्पेशल ,राजवाडी स्पेशल ,मामरि मिडीयम ,एक्स्पोर्ट ऐशिया ,हाय ग्रोन टेस्ट ,स्वगतंम ,नागरिक अख्या प्रकारे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. १०० हा आकडा जसा मोठा आहे तसच या चहापावडरच्या दराचा आकडा देखील मोठा आहे . ४०० ते १४ हजार प्रति किलो किमतीच्या चहापावडर मुंबई APMC मार्केट मध्ये विक्री साठी असतात पण सगळ्यात जास्त ग्राहक वर्ग हा विदेशातला आहे. या मार्केट मधील व्हाईट टि प्रति किलो १४ हजार किलोने विकला जातो. काय मग थोडा धक्का तुम्हालाही बसलाच असेल ना ?तर आजची हि चहापावडर च्या किमती ची गोष्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा.