महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित; मुंबई APMC मार्केटचे टेंशन वाढले
कर्नाटक पाठोपाठ ओमिक्रॉनच्या केसेस सापडल्यानंतर महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली आहे. आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हे सर्व संशयित मुंबई, पुणे व ठाणे या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे मुंबई एपीएमसी बाजारात कर्नाटकसह या तिन्ही शहरातून लोकांची ये-जा एपीएमसी मार्केटमध्ये असते. त्यात एपीएमसी मार्केट हे गर्दीचे ठिकाण असल्याने रुग्णसंख्याचा विस्फोट होण्याची दाट शक्यता आहे. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण असून इतर 18 विविध शहरात आहेत.
त्यामुळे मुंबईलाच लागून असलेल्या नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये मुंबईहून लोकांचे नियमित ये-जा असते. शिवाय एपीएमसी मार्केटमध्ये सर्रास नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. परदेशातून महाराष्ट्रात आलेले 25 जण हे 3 जणांच्या संपर्कात आहेत. या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत देखील २५ जण परदेशातून आले असून त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र, तरी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दक्षतेखाली ठेवण्यात आले आहे.
गेल्या महिन्याभरापासून परदेशातून मुंबईत जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त जण दाखल झाले आहेत. त्यामुळे याच्या संपर्कातील लोकांची जर मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ये-जा असेल तर एपीएमसी मार्केट ओमिक्रोनचा हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर मार्केटमध्ये पुन्हा आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करावी अशी मागणी होत आहे. ओमिक्रॉनचे हे सर्व संशयित मुंबई, ठाणे व पुण्यात आहेत. शिवाय हि शहरे मुंबई एपीएमसी मार्केटच्या भोवताली असल्याने एपीएमसी मार्केटसह नवी मुंबई शहराचे हि धाबे दणाणले आहेत. शिवाय २४ तासात हा आकडा वाढल्याने पुढील २४ तास राज्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत.