मुंबई APMC बाहेर चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर होणार कारवाई; अनधिकृत उपबाजारपेठां समितीच्या रडारवर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर घाऊक बाजारपेठा चालवणाऱ्या अथवा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. हि समिती प्रतिमाह एपीएमसी प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईचा आढावा घेणार आहे. राज्य सरकारकडून पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती कार्यरत असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पाटलांसह एकूण सात लोकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित समिती एपीएमसीमार्फत परिसरातील कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस आणि मुंबईसह परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर उपबाजारांवर कारवाई करणार आहे. त्याबाबतचा आढावा आतादर महिन्याला गठीत केलेली समिती घेणार आहे. नवी मुंबई परिसरात इराणी सफरचंद अफगाणिस्थान मार्फेत आणून इराणी आणि अफगाणिस्थान व्यापारी कोल्ड स्टोरेजमधून बेकायदा व्यवसाय करत होते. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
असे व्यवसाय नियमनमुक्ती झाल्यापासून फोफावला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बाजार समिती मुंबईमधून हलवताना या ठिकाणी व्यतिरिक्त कोठेही घाऊक व्यापार होणार नसल्याचा विश्वास व्यापाऱ्यांना देण्यात आला होता. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत व्यापार होत असल्याने नियुक्त समिती तर्फे या बाजारपेठांवर अंकुश लावण्यात येणार आहे. तर कोल्ड स्टोरेज मध्ये होणाऱ्या इराणी व्यापाऱ्याचे पुरावे घेऊन आम्ही मंत्रालयात गृहमंत्री, पणनमंत्री, पणन संचालक आणि सचिव यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीत गृहमंत्र्यांनी अनधिकृत व्यापारावर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती बाजार समिती सदस्य संजय पानसरे यांनी दिली.
अशा अवैध व्यापाराला प्रथम नोटीसा बजावण्यात येणार आहे. नोटीस बजावून सुद्धा व्यवसाय बंद होत नसल्यास थेट जप्तीची कारवाई होणार आहे. शिवाय   एपीएमसी मार्फत पणन कायद्याच्या आधारे या व्यापाऱ्यांच्या दररोजच्या नोंदी, व्यवहाराच्या चौपड्या तपासणी केल्या जाणार आहे. तर शेवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. कारवाई होणाऱ्या शहरातील स्थानिक पोलीस एपीएमसीला मदत करणार आहेत. सगळ्यात शेवटी कारवाईचा लेखाजोखा दर महिन्याला बाजार समिती समोर मांडला जाईल. अशा प्रकारे समितीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती अशोक डक यांनी दिली आहे.               या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे , कामगार विभागाचे आयुक्त सुरेश जाधव, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, मुंबई सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, बाजार सदस्य संजय पानसरे, अशोक वाळुंज, शंकर   पिंगळे, माजी सदस्य बाळासाहेब बेंडे, बाजार समिती सचिव संदीप देशमुख, उपसचिव महेंद्र म्हस्के आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.