दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज.
दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अंदाज.
शेतकऱ्याची खरी दिवाळी ऑक्टोबर नंतरच
गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा १५ ते २५ रुपये किलोने मिळत होता. लवकरच कांद्याचा जुना साठा संपणार असून, सध्याचा पुरवठा शेतकऱ्यांकडून नसून त्या साठ्यातून होत आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. किरकोळ बाजारात कांदा महागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे वखारीत ठेवलेला कांदा शेतकरी बाहेर काढू लागले आहेत. पावसामुळे कांदा खराब होत आहे. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सुमारे 60-80% वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताजे पीक बाजारात येईपर्यंत किमतीतील तेजी कायम राहील. दरम्यान, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. यामुळे राहिलेल्या कांद्याला तरी चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. यामुळे आता दिवाळीनंतर तरी कांद्याला चांगला दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.