APMC NEWS IMPACT: पनवेल APMC मधील ते ओटे अखेर हटवण्यात आले , शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळाले यश
APMC NEWS IMPACT: पनवेल APMC मधील "ते" ओटे अखेर   हटवण्यात आले , शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळाले यश !
- शेतकऱ्यांच्या जागेवर मनमानी करून बांधले होते अनधिकृत ओटे
- पनवेल APMC च्या   भोंगळ कारभारबद्दल APMC NEWS ने दाखवली होती बातमी
- पनवेल बाजार समिती प्रशासनचे लाखो रुपये गेले पाण्यात
- शेतकऱ्यांनी APMC NEWS चे मानले आभार !!
पनवेल कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासन तर्फे   शेतकऱ्यांच्या जागेवर जे अनाधिकृत १४ ओटे बांधण्यात आले   होते,अखेर ते ओटे रात्री हटवण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या या भोंगळ कारभारबद्दल बाजारघटकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे ,पनवेल APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या   शेतमालासाठी जी जागा होती त्या जागेवर बाजारसमितीने ओटे बांधले होते ते ओटे   हटवण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन ठिय्या आंदोलनाचा   इशारा पनवेल बाजार समितीला दिला होता.पनवेल बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांवर   केलेल्या या अन्यायाविरुध्द   APMC NEWS ने १५ डिसेंबर रोजी बातमी दाखवली होती, शेतकऱयांच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलेले ओटे हटवण्यात यावे ,हा मुद्दा शेतकऱ्यांनी प्रशासनसमोर मांडला ... अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे..   त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या असून अनधिकृतपाने   बांधलेले ओटे रात्री   हटवण्यात आले.. सदरची जागा मोकळी झाली असून हिसवलेली जागा पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे.. संपुर्ण शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी   APMC NEWS चे विशेष आभार मानले ...