Apmc news Impact : मुंबई APMC चे सचिव दखल घेतल्याने व्यापाऱ्याने दिली शेतकऱ्यांना 11 हजार रुपये
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये व्यपाऱ्याने ८०१ किलो फ्लॉवर बिकून शेतकऱ्यांना दिले होते ९ रुपये ५० पैसे
भाजीपाला मार्केट D विंग ५१८ गाळ्यावर शेतकऱ्याने ८०१ किलो फ्लॉवर पाठवले होते
APMC News डिजिटल यांनी या प्रकरण उचलला होता
शेतकरी किसन फराटे यांच्या शेतमालाची किमत मिळल्याने त्यांनी APMC न्यूज डिजिटलचे आभार मानले
 
नवी मुंबई: शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ   जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी थेट शेतमाल घेऊन आला की त्याची हरप्रकारे अडवणूक आणि तोच शेतमाल दलालामार्फत विक्रीस आला, की त्याला चढय़ा किमतीने दर मिळत असल्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. या साखळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकरी हद्दपार झाला असून त्यांची जागा अनधिकृत व्यापार   करणाऱ्या वयापारी   घेतली असल्याचे चित्र आहे.असेच एक घटना   मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये घडली आहे . 
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी किसन फराटे यांनी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांच्याकडे ११ ऑगस्ट रोजी आपला ८०० किलोचा फ्लॉवर पाठवला. या सर्व मालाला एकूण २ हजार ६८४ रुपये इतकाच दर आला. यातून वाहतूक भाडे, हमाली आणि वजनखर्चापोटी २ हजार ६७५ रुपये वळते करून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात फक्त ९ रुपये ५० पैसे आले.शेतकऱ्यांनी या व्यपाऱ्याना त्याचे ९ रुपये ५० पैसे पार्ट चेक द्वारे पाठवले ही बातमी सर्व प्रथम APMC न्यूज डिजिटल ने उचलून धरल्यामुळे, बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख यांनी एक्शन मोडवर आले आणि मार्केट सचिव मारुती पवितवार याना सदर व्यपाऱ्याना बोलून शेतकऱ्याची ११ अगस्त रोजी बाजारभाव प्रमाणे पैसे देण्याची आदेश दिली त्यामुळे व्यपारी सूर्यकांत शेवाळे यांनी मांडवगण येथे जाऊन शेतकरी किसन फराटे यांना 11 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिला परंतु शेतकऱ्यानी हे सर्व पैस्यासाठी केले नसून शेतकरी राजाला न्याय मिळून देण्यासाठी केले असल्याचे सांगितले. आणि वयापारी सूर्यकांत शेवाळे   यांनी दिलेला ११ हजार रुपयाची धनादेश मांडवगणचे ग्रामदैवत वाघेश्वर मंदिराला अर्पण केला. यावरून शेतकरी खरंच राजा असल्याची प्रचिती आली यावेळी किसन फराटे यांनी APMC न्यूज डिजिटलचे आभार मानले.