सफरचंद शेर तर स्ट्राबेरी सव्वाशेर स्ट्राबेरी २०० रुपये प्रतिकिलो
सफरचंद शेर तर स्ट्राबेरी सव्वाशेर स्ट्राबेरी २०० रुपये प्रतिकिलो
मुंबई Apmcया फळ मार्केटमध्ये हिवाळा सुरु झाल्यापासून स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. तर सध्या विक्रमी दर स्ट्रॉबेरीला मिळत असून, सफरचंदापेक्षा दुप्पट दराने विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे 'सफरचंद शेर तर स्ट्राबेरी सव्वाशेर' असल्याचे स्ट्राबेरी व्यापारी सांगत आहेत. शिवाय   ग्राहकांकडूनही मागणी वाढू लागल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये महाबळेश्वर आणि नाशिक येथून प्रतिदिन २५ ते ५० टन स्ट्रॉबेरीची आवक होत आहे. सध्या बाजारात स्ट्रॉबेरीला १३० ते २३० रुपये भाव मिळत असून किरकोळमध्ये २५० ते ३०० रुपयांना विक्री होत आहे. गोड फळांपेक्षा आंबट, गोड चव असलेल्या स्ट्रॉबेरीची भुरळ पडू लागली असून, दर जास्त असले तरी समाधानकारक विक्री होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.