मुंबई Apmc भाजीपाला मार्केट मध्ये रोकड हमाल कामगाराची हत्या
भाजीपाला मार्केट मध्ये रोकड हमाल कामगार शंकर पानसरे यांची हत्या 
आरोपी रवी शंकरच्या डोक्यात लाकडी फाट्याने मारहाण करून केली   हत्या
हत्या करणाऱ्या आरोपी रवी आणि शंकर एकत्र राहत होते 
रविवारी सुटीच्या दिवशी झली हत्या 
भाजीपाला मार्केट E ८९७ समोर पॅसेज मध्ये हत्या 
Apmc मार्केटची सुरक्षा रामभरोसे
गांजा आणि गुटखा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरु आहे.
मुंबई एपीएमसीच्या फळ आणि भाजी मार्केट झाली धर्मशाळे
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अनेक परराज्यातून कामगार येऊन राहतात. त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद संबंधित प्रशासनाकडे नाही.
पोलिसांना या दोन्ही मार्केटमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केला पाहिचे बाजार घटकाची मागणी.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये काम करणाऱ्या रोकड हमाल कामगार शंकर पानसरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे या हत्या करणाऱ्या दुसरी कोण नाही रवी म्हणून   आहे ,रवी आणि शंकर दोन्ही रोकड हमाल कामगार आहे दोघे रात्री काम करयचा आणि एकत्र राहायचं, रविवार सुट्टीच्या दिवशी संध्यकाळी ८च्या सुमेरास इ विंग ८९७ च्या समोर पॅसेजवर आरोपी रवी शंकरच्या डोक्यात मागून लाकडी फाट्याने मारहाण करून निर्घृण हत्या केल आणि फरार झालं . यापूर्वी दोघे गाळ्यावर जुगार खेळले होते आणि   गांजा पिले होते अशी माहिती एका व्यपाऱ्याने दिली .फरार झालेल्या आरोप रवीच्या   पूर्ण नाव आणि पत्ता एपीएमसी प्रशासनाकडे नाही . एपीएमसी पोलीस   सीसीटीव्ही फुटेज साहयाने आरोपी रवीला शोध घेत आहेत .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याबाहेरुन येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले होते, राज्यात बाहेरुन कोण, कशासाठी आणि कोठून येत आहे याची नोंद ठेवली जाणार होते . मात्र , आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ   ओळख असलेल्या मुंबई   एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. या परिसरात गांजा, गुटखा, दारुच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत. बांगलादेशी नागरिकांचे तर हे मार्केट जणू आश्रयस्थानच झाले आहे. या मार्केटमध्ये   गाडीत स्फोट घडवून आणण्यात आला होता. बाहेरील गुंडानी येऊन व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही या मार्केटच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे आओ जाव घर तुम्हारा .
मागील अनेक वर्षांपासून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अनेक परराज्यातून कामगार येऊन राहतात. त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद संबंधित प्रशासनाकडे नाही. सीसीटीव्ही असून सुद्धा ते काम करत नाहीत त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकूणच के तर मुंबई बाजार समितीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी पोलिसांनी वारंवार पत्र व्यवहार करुन देखील याबाबत व्यापारी, प्रशासन पोलिसांना माहिती पुरवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अनेकवेळा याच मार्केटमधून ताब्यात घेण्यात आले आहे. बाजार समितीच्या फळ आणि भाजी मार्केटला तर अक्षरशः धर्मशाळेचे स्वरुप आले आहे. या ठिकाणी विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या कामगारांविरोधात कोणतेही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे पालन होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.