सावधान! राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ वर
राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ झाल्याने राज्याचा धोका अजून वाढला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने उपाययोजनांसह रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालय रेडी पझेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रुग्णालयात जास्तीत जास्त बेडची सोया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंद असलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनसाठी कोविड सेंटरमध्ये राहायचे नसल्यास काही ठिकाणी हॉटेलची सूविधा दिली जाणार आहे. मात्र, हॉटेलचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे. शिवाय राज्यात ठिकठकाणी ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळा, ओमिक्रॉनला दूर ठेवा
जगभरात 40 देशांत ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय. अवघ्या दोन दिवसांत 23 देशांत संसर्ग परसरला आहे. ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद नाही. 1 ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात 31 डिसेंबरच्या उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.