यंदापासून भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा !
यंदापासून भोगी सण "पौष्टिक तृणधान्य दिवस" म्हणून साजरा !
- संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून केले घोषित.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाकडे ठराव.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त यंदापासून भोगी हा सण पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. तृणधान्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी साजरी करण्यात येणारी भोगी पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत ज्या ज्या विभागांकडून बालके, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांना विविध योजनांतर्गत उपहारगृहातून फराळ, माध्यान्ह भोजन किंवा जेवण पुरविण्यात येते.अशा विभागांनी भोगीदिवशी तृणधान्यांचा जाणीवपूर्वक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भोगीदिवशी आहारात तृणधान्याचा वापर करण्यात येतो. या परंपरेचा आधार घेऊन कृषी विभागाने ही मोहीम आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाकडे ठराव पाठविण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण भारतात तृणधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत.
ब्युरो रिपोर्ट APMC न्युज