Big Breaking ! APMC मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ED कडे तक्रार
Big Breaking ! APMC मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ED कडे तक्रार
APMC मार्केट मधील काही संचालक, अधिकारी आणि कर्मचारी ईडीच्या रडारवर.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी एपीएमसीतील आर्थिक गैरप्रकार, संस्थेमधील घोटाळे प्रकरणात {अंमलबजावणी संचालनालय} {enforcement directorate} कडे औपचारिक तक्रार केली आहे. बाजार समितीच्या   सदस्यांची तक्रारमुळे एपीएमसी मार्केट मध्ये खळबळ उडाली आहे.
APMC NEWS ने राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या संवेदनशील विषयावर फोनवरून भाष्य करता येणार नाही, कारण अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्राने सांगितले प्रमाणे पाटील यांनी ईडीकडे अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकाऱ्यावर मोठी कारवाई होऊ शकतो.