BIG BREAKING: भाजपा माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मिडीयावर व्हायरल करणे संदिप म्हात्रे याना महागात पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ६० वर्षांपासून बेळगाव मुंबईत आणू म्हणणाऱ्या पक्षाचे स्वागत अशा प्रकारे केले पाहिजे. मुंबईत बसून "नुसत्या मोठमोठ्या बाता, चप्पल खाई नेता" त्यासोबत हसणाऱ्या २ ईमोजी तसेच त्याखाली राज्याचे मुख्यमंत्री यांचा हात जोडलेला आणि गळ्यात चपल्लांचा हार घातलेला फोटो त्यावर कन्नड आणि इंग्रजी भाषेतील मजकूर असलेला फोटोसह बदनामीकारक पोस्ट संदिप म्हात्रे यांनी @Surya 20111988 या ट्विटर खात्यावरून ६ जानेवारी रोजी १२ वाजून ४२ मिनीटांनी शेअर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हि तक्रार शिवसेना उप शहर प्रमुख विजयानंद शंकर माने यांनी दाखल केली होती. या प्रकारे उद्धव ठाकरें विषयी लेखनाबद्दल संदीप म्हात्रे यांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
म्हात्रेंनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी शिवसैनिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेंवर कारवाई केली. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत.