नवी मुंबई RTO कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न
नवी मुंबई वाशी उप प्रादेशिक  अधिकारी परिवहन कार्यालयात २६/११ शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर पार पडले. वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था नवी मुंबई तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने १०० बाटली रक्त संकलन करण्यात आले. शिबिरात संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे उदघाटन
उप प्रादेशिक अधिकारी हेमांगीनी पाटील, सहायक उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम, निरीक्षक प्रशांत शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. तर संस्थेचे अध्यक्ष राजेश भोईर, सचिव धनंजय पाटील, उपाध्यक्ष किरण ढवळे, सदस्य निलेश कचरे, अमरजीतसिग शम्मी, दता सुरवसे, किरण माणगावकर आदि मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.