BMC ELECTION: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट,मुंबईतील 500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ.
-मुंबईतील नागरिकांसाठी ठाकरे सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीय. 500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आलंय.
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या उपस्थिती ऑनलाईन पद्धतीनं यासंदर्भातील कार्यक्रम पार पडला.
-मालमत्ता कर माफीचा मुंबईतील 16 लाख कुटुंबांना फायदा होईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
-उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे -
-शिवसेनाप्रमुख स्वत: जातीने जाऊन रस्त्याचं काम, नालेसफाई, सौंदर्यीकरण इत्यादींच्या सूचना देत असतं. हेच पाहत मोठा झालोय. नालेसफाईचं काम नाल्यात उतरून पाहिलंय. आता ताण आदित्यनं कमी केलाय.
-अनेकजण असतात किंवा आहेत, वाट्टेल ते सांगतात. लोक फसतात. मग लोक मतं देऊन मोकळी होतात. पण शिवसेना असं करणार नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघे एकत्र येत पुढे जात आहोत.
-मोडणारं वचन द्यायचं नाही, हे शिवसेनेचं तत्व आहे. हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत.
-2017 ला मुंबईकरांना वचनं दिली. आपण वचननामा दिला आणि पाळला. बहुतांश वचनं पूर्ण केली होती. एक राहिलं होतं, ते म्हणजे मालमत्ता कराचं. ते आता पूर्ण केलंय.आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो, ते करतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.
निर्णयाचा फायदा किती कुटुंबांना
500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले.