मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये भरदिवसा चोरी, चोराची हालचाल CCTV मध्ये कैद
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये भरदिवसा   चोरी, चोराची हालचाल   CCTV मध्ये कैद
- सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने मार्केट मध्ये चोरी
- सभापती , मार्केट संचालक आणि उप सचिव यांचा सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाठिंबा
- भाज्यांचे दार महागले आणि मार्केट मध्ये चोरीचे प्रमाण वाढले
व्यापाऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची ?
चोरी प्रकरणामुळे बाजार घटक चिंताग्रस्त. 
मुंबई APMC   भाजीपाला मार्केट मध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे , सध्या तुम्ही जी व्हिडीओ पाहताय त्या मधील माणूस मुंबई APMC भाजीपाला मार्केट E विंग मध्ये एका गाळ्यात   कोबी ची एक गोण उचलून नेताना दिसत आहे. २७ ऑक्टोबर दुपारी ३ वाजता हि घटना घडली असून चोर CCTV कॅमेरा मध्ये कैद झालाय. भाजीपाला मार्केट मध्ये दिवसाढवळ्या चोरी होत असताना तेथील सुरक्षा रक्षक झोपेत असतात का असं प्रश्न उपस्तीत झालाय . मार्केट मधील अनेक   समस्यांचे निवारण अजूनही झाले नाही त्यात मार्केट मधील चोरीचा प्रकार वाढत चालाय. या प्रकरणामुळे व्यापारी त्रस्त आहेत दिवसरात्र कष्ट करून व्यापाऱ्याचे नुकसानच होत आहे. भाजीपाला मार्केटचे संचालक ,सभापती आणि   उपसचिव यांचं मार्केट कडे लक्ष आहे का ? मार्केट मधील समस्या सोडविण्यात ते अयशस्वी आहेत परंतु या चोरी प्रकरणाला आळा   बसवू शकतील का ? व्यापाऱयांनी दाद कोणाकडे मागायची त्यांच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न बाजार घटकाला पडला आहे. मार्केटमध्ये पॅसेज ,धक्के मध्ये अनधिकृतव्यापार   ,चोरी ,हत्या ,आणि गुटखा विक्री   उघडपणे होत आहे ,सध्या मार्केटचे रूपांतर धर्मशाळेत झाले आहे मात्र सभापती आणि मार्केट संचालक सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आहे.