भारत आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यात व्यवसायाची उत्तुंग वाटचाल.
भारत आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यात व्यवसायाची उत्तुंग वाटचाल
स्काय लुक्स एव्हिएशनच्या माध्यमातून नवी भरारी
नवी मुंबई : स्काय लुक्सच्या माध्यमातून खासगी जेट सर्व्हिस सुरु करण्यात आली असून त्यात दुबई सरकारची भागीदारी लाभली आहे. सध्या हि सर्व्हिस मुंबई व दिल्लीतून सुरु असून लवकरच इतरही प्रमुख शहरातून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने भारतात इतरही व्यवसायाच्या संधीच्या शोधात दुबईचे तरुण उद्योजक व महामहिम शेख हमदान बिन अहमद अल मक्तुम यांच्या कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद अल जरीरी हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतात व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध असल्याचे उद्गार काढले. तर उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून भारत व दुबई यांचे नातेसंबंध अधिक घनिष्ट होणार असल्याचेही ते म्हणाले. 
भारतात आपण यापूर्वी अनेकदा आलो असून नवी मुंबईत मात्र प्रथमच आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र इतर शहराच्या तुलनेत नवी मुंबई आपल्याला आवडली असून येत्या काळात नवी मुंबईचा अधिकाधिक कायापालट झालेला असेल असेही ते म्हणाले. तर स्काय लुक्सच्या माध्यमातून सुरु केलेल्या व्यवसायाला लवकरच उच्च स्थानावर पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करत लवकरच सर्वांना आकर्षित करेल अशी संकल्पना प्रत्यक्षात साकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी शेहाब मलाला अहमद अब्दल्ला बिनौरी, युवा नेते वैभव नाईक, उद्योजक दीप भानुशाली, अभिजित अरोरा, कुलदीप सिंग आदी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी महामहिम शेख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तर शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना जय महाराष्ट्र बोलून उपस्थितांची मने जिंकली.