मुंबई APMC मार्केटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यवर्ती   इमारत येथे मुंबई एपीएमसी युनिटचे   रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार गणेश नाईक ,आमदार शशिकांत शिंदे ,माथाडी नेते नरेंद्र पाटील ,सभापती अशोक डक , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख,आरपीआय जिल्हाध्यक्ष सिद्राम ओव्हाळ ,   विविध संघटनांचे पदाधिकारी, मुंबई एपीएमसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.