मुंबई APMC सभापती अशोक डक यांची खुर्ची वाचविण्यासाठी सहकारमंत्री अतुल सावे रिंगणात!
मुंबई APMC सभापती अशोक डक यांची खुर्ची वाचविण्यासाठी सहकारमंत्री अतुल सावे रिंगणात!
एपीएमसी माजलगाव बाजार समिती मधून शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर बाजार समितीचे संचालक म्हणून अशोक डक यांचा बाजार समिती सभापती पदी वर्णी लागली होती. पण त्याचा दोन वर्ष दोन महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आज ता १० रोजी डक यांचा सभापती पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. पण मुंबई एपीएमसी   सभापती अशोक डक हे   राष्ट्रवादीचे असताना देखील त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे सहकारमंत्री अतुल सावे रिंगणात उतरले असून त्यांना सभापती पदावर ठेवण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे.
राज्यात विविध बाजार समिती मधून निवडून आलेले शेतकरी प्रतिनिधी यांच्या संचालक पदाची मुदत संपली होती . त्यांना मुदत वाढ घेण्यासाठी एका संचालकांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत मुदत संपलेल्या संचालकांना बरखास्त करून त्या बाजार समिती मध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पणन संचालकांनी मुदत संपलेल्या संचालकांना बरखास्त केले होते. पण राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकार ७ संचालकाच्या पात्रतिचे   आदेश काढले होते. पण हा आदेश चुकीचा असल्याचे प्रसार माध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिंदे सरकारने पुन्हा सुनावणी लावली आहे. पण माजलगाव बाजार समिती मधून निवडून आलेले मुंबई एपीएमसी चे सभापती अशोक डक यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपुष्ठात आला आहे. त्याचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यामुळे सभापती अशोक डक यांनी सभापती पदाची खुर्ची टिकवण्यासाठी शासन दरबारी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा बाजार समिती मध्ये सुरु आहे. मागील महिन्या भरापासून बाजार समिती मधील असणारे प्रश्न सोडवण्याकडे देखील डक यांना वेळ मिळाला नसल्याची खंत बाजार समिती मधील घटकांची आहे. तर राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या बरोबर देखील डक यांची घनिस्ट संबंध असल्यामूळे सावे यांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे. पण   अशोक डक यांची खुर्ची जाणार का रहाणार या बद्दल बाजार समिती मध्ये चर्चा सुरु असून सभापती पदासाठी वर्णी लागावी यासाठी देखील अनेक संचालकानी फिल्डिंग लावली असून या मध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.