मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस !
शिंदे -फडवणवीस सरकारने विदर्भाला दिलासादायक घोषणा जाहीर केल्या.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी तसेच विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा जाहीर   केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.. याचा लाभ धान उत्पादक जिल्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार अशी मोठी घोषणा मुख्यामंत्रानी अधिवेशनात केली आहे.. हा बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भाचा विकास होणे महत्वाचा आहे.   समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबईमधील अंतर कमी झाले आहे. समृध्दी महामार्गामुळे सगळ्यांची समृध्दी झाली, असे   मुख्यमंत्री म्हणाले... धान खरेदीत कोण्त्याही प्रकारची अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही . केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टॅन धान खरेदीस मंजुरी दिली आहे .. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.    
ब्युरो रिपोर्ट APMC NEWS