मुंबई APMC फळ मार्केटमध्ये महाशिवरात्री निमित्त कलिंगड आणि खरबुजाला मागणी
उद्या आलेल्या महाशिवरात्री निम्मित कलिंगड आणि खरबूजा फळाला चांगलीच मागणी वाढली आहे. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये कलिंगड २५ ते ३० गाडी तर टरबूज १० गाडी आवक झाली आहे. सध्या वातावरणातील तापमान देखील वाढू लागल्याने ग्राहकांनी रसाळ फळांना पसंती दिली आहे. कलिंगड १२ ते १६ रुपये किलो तर खरबूजा २० ते ५० रुपये किलो विक्री होत आहे. तर या फळांची मागणी वाढू लागल्याने व्यापारी देखील समाधान व्यक्त करत आहेत.
शिवरात्री पासून मागणीला सुरुवात होऊन जसजसा उन्हाळा येईल तशी मागणी वाढत जाते असे कलिंगड व्यापारी हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितले.
याच बरोबर उद्या शिवरात्रीसाठी सफरचंद १२० ते १४० रुपये तर केळी ३० डझनने विकली जात आहे.