मुंबई APMC मार्केटच्या विकासकामे गेल खड्यात,संचालक अलिबागच्या समुद्र किनाऱ्यात!
मुंबई   APMC मार्केटच्या विकासकामे गेल खड्यात,संचालक अलिबागच्या समुद्र किनाऱ्यात!
Apmc News Network
नवी मुंबई - शेतकऱ्यांना परतीच्या पावसाच्या फटका बसल्याने शेतकरी आत्महत्यांच्या सत्र सुरूच मात्र त्या भागातून आलेल्या सभापती आणी संचालक अलिबाग रिसॉर्ट मध्ये मौजमस्ती मध्ये व्यस्त आहेत. मराठावाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालाय. गेल्या 72 तासांत तब्बल 11 शेतकऱ्यांनी आपले   जीवन संपवल   आहे. त्यामुळे   विदर्भ व मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी डोकेदुखी वाढवणारी अशी आहे.
शेतकरी मरतोय, कामगार मरतोय. व्यापारी आणि ग्राहक सुरक्षित नाहीत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने निवडून आलेल हे संचालक मंडळ गेल्या तीन वर्षात मार्केट चा विकास करायचा सोडून स्वतःचा विकास करण्यात व्यस्त आहेत. सभापती आणि संचालक फक्त जाणे आणि येणे एवढंच काम करतंय.
सभापती आणि उप सभापतीची   गाडी पनवेल,खारघरच्या पुढे गेली की शेतकरी त्यांच्या डोक्यात राहत नाही. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तर कोणी वालेच राहिला नाही. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी प्रतिनिधी जे मुंबई APMC मध्ये येऊन 3 वर्ष झाली आहे त्या   शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत हे दुर्दैव आहे. जे   व्यापारी   प्रतिनिधी   मार्केटमध्ये येतात   त्यांच्या   डोक्यात व्यपाऱ्याच्या प्रश्न राहत नाही त्यांना कसे टेंडर काढायचं ? झालेले कामाचे परत टेंडर काढत राहायचे आणि मालमत्ता कशी विकायची, पुनर्बांधणीसाठी विकासकाला आणण्याची धावपळ.
मार्केटची   स्थिती दयनीय झाली असून मार्केटची   कामे पडून राहिली आहेत दुसरीकडे आपल्या संचालक मंडळ टिकवण्यासाठी संचालक मंडळ गुप्त बैठक आणि   मौजमस्ती   करण्यासाठी अलिबागच्या एका रिसॉर्ट मध्ये   गेले आहे.कोणाची नजर पडू नये म्हणून मुंबई पासून १०० किलोमीटर दूरर्व संचालक मंडळ एका रिसॉर्ट मध्ये दोन दिवसापासून पडून राहिले होते अशी माहिती सूत्राने दिली आहे   . या बैठकीत विचारधीन असलेले 7 संचालक आणि काही दिवसात   सभापती आणि इतर संचालकांचा   कार्यकाळ   संपणार आहे तसेच मार्केटच्या विविध प्रश्नावर   मंथन करण्यात येईल असे   सांगितले जात आहे. या अगोदर मार्केटचे   सर्व संचालक आणि उप सभापती आपल्या पदे टिकवणायसाठी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या कडे दाद मागत   होते मात्र तिथे   काही झाल नाही   अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .
संचालक मंडळ येऊन जबलपास ३ वर्ष झाली आहे .मार्केटच्या आणि शेतकऱ्याच्या विकास कश्या   पद्धतीने व्हावा   त्यासाठी शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी   प्रतिनिधी या सर्व   संचालकांना   निवडून दिले मात्र 3 वर्ष होऊन गेले मार्केटचे एक पण विकास कामे झाली नाही झाली तर या संचालकांची मिटिंग,गाडी भाडे ,हॉटेल आणि जेवणात लाखो रुपये खर्च . काही महिन्या पूर्वी पणन संचालक यांनी   कार्यकाळ संपल्यावर   त्याभागातुन आलेल्या 7 संचालक   बरखास्त केले होते आपलं संचालक मंडळ टिकून राहावी या करीता 6 महिन्यापासून मंत्र्यांसोबत भेटीगाठी   आणि मंत्रालयच्या फेरफाटा मारून हातात काही लागले नाही   . महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळली आणि शिंदे फडणवीस सरकार आल .एका खासदारांच्या सांगिल्यावरून हे 7 संचालक मंडळाचा बरखास्तीची आदेश रद्द करून परत रुजू   करण्यासाठी आदेश काढण्यात आली . मात्र   हे आदेश चुकीच्या असल्याची बातमी असल्याने   पुन्हा शिंदे फडणवीस सरकारकडून सदर प्रकरण प्रलंबित आहे.   कधीहि हे   संचालक मंडळ बरखास्त होऊ शकतो मात्र त्याआधी सर्व प्रकारची   फिल्डिंग लावण्यात आली आहे त्यासाठी दादा ,पाटील आम्हाला वाचवा असे धावपळ काही संचालक करत आहे .
कधी APMC च्या गेस्ट हाऊस तर कधी मंत्रालय शेजारी आमदार निवास तर आता अलिबाग रिसॉर्ट असे फेरफाटा सध्या संचालक मंडळाच्या   दिसत आहे . दुसरीकडे मार्केटच्या जे कामे पडून राहिलेले आहे ते सध्या रामभरोसे आहे. मार्केटमध्ये रस्ते ,गटार ,पॅसेज धक्यावर अनधिकृत व्यापार ,भाजीपाला मार्केट सध्या सुरक्षा   कर्मचाऱ्याच्या   ताब्यात आहे. " इथे आओ जाओ   घर तुम्हारा " अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे .   मार्केट मध्ये CCTV नाही , मार्केटच्या आत आणि बाहेर   वाहतूक कोंडी   होत आहे . हि सगळी   काम बघण्यासाठी   संचालक मंडळाला   शेतकरी   आणि व्यापारी   प्रतिनिधींनी   निवडून दिले होते मात्र   3 वर्ष झाली काही काम केले नाही मार्केटमध्ये दिखावा करण्यासाठी सभापती अशोक डक पाहणी दौरा करतात   त्याचदरम्यान   मार्केटसंचालक यांनी व्यपाऱ्यासोबत   फोटो शूट केले.   ३ वर्षात अशीच   कामे   करण्यात आली . सभापती आणि उप सभापती साहेब तुमच्या   मंडळाला ज्यावेळी शेतकरी आणि व्यपाऱ्याने निवडून दिले त्यावेळी तुम्ही काय काय आश्वासन दिली   होती ते तुम्ही विसरले आहात   त्यामुळे तुम्हाला शेतकरी आणि व्यापारी आता घरी बसवणार आहेत   त्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात येत आहे.मात्र राजकारणात काहीहि होऊ शकत .