इलेकट्रीक वाहनांमुळे प्रदूषणमुक्त भारताला हातभार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे नवी मुंबई वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांचा रोड शो करण्यात आला. या शोमध्ये विविध कंपन्यांच्या   दुचाकी, चारचाकी ते महानगरपालिका विद्युत बसचा समावेश करण्यात आला होता. विद्युत वाहनांचा वापर करून प्रदूषण कमी कारण्याहेतू या शोचे आयोजन करण्यात आल्याचे महावितरण प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले. या प्रसंगी महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमी आदी मान्यवर आणि प्रदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील जनतेला प्रदूषणमुक्त संदेश देण्याचा प्रमुख उद्देश या माध्यमातून करण्यात आला. शिवाय इलेक्ट्रिक वाहने अतिशय अल्प खर्चात चालणारी वाहने आहेत. या वाहनांना महावितरणने सवलतीच्या दरात टेरिफ उपलब्ध करून दिला आहे. पेट्रोल वाहनांच्या एक चथुर्तांश दरात हे चार्जिंग उपलब्ध करण्यात आले आहे. हि वाहने वापरल्याने प्रदूषण टळून खर्च वाचणार आहे. शिवाय नव्या पिढीला प्रदूषणमुक्त भारत देताना मदत होणार असल्याचे हि सांगण्यात आले. या वाहनांच्या वापरामुळे भारतात असलेले ७ टक्के प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समनव्यातुन हा प्रकल्प राबवण्यात आल्याचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.