नवी मुंबई विमानतळावर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; हजारोच्या संख्यने सहभागी होऊन काम बंद आंदोलन
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त पेटून उठला असून नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. गेली वर्षभर विविध रूपाने हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातील महत्वाचा टप्पा म्हणून आजच्या काम बंद आंदोलनाची भूमिका प्रकल्पग्रस्तानीं घेतली आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय २७ गाव कृती समित्यांसह विविध संघटना सहभागी झाल्याने विमानतळाला छावणीचे स्वरूप आले आहे.
हजारोच्या संख्यने प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका प्रकल्पग्रस्थांनी घेतली होती. या अनुषंगाने दि. बा. चे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे यासाठी प्रकल्पग्रस्त पेटून उठल्याचे दिसते. या परिस्थितीत मात्र त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांना जाण्यास पोलिसांनी बंदी घातली असून महामार्गांसह गावागावांच्या वेशीवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
गेली वर्षभर विविध रूपाने या आंदोलनाला सुरुवात झाली. तेव्हा पासून परिसरातील बहुजन प्रकल्पग्रस्त हा दि.बा. पाटलांचे नाव विमानतळाला लागावे यासाठी आंदोलने करत आहे. सामाजिक माध्यमांवरील हॅशटॅग मोहीम असेल अथवा रस्ता बंद आंदोलन असेल प्रकल्पग्रस्त सातत्याने आंदोलनाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.