शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी करतात आत्महत्या-अजित पवार
शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी करतात आत्महत्या-अजित पवार
शेतकऱ्यांच्या बळीला नव सरकार जबाबदार
दररोज ३-४ शेतकऱ्यांचे बळी शेतकरी आत्महत्या अजित दादांचा गंभीर आरोप
नवी मुंबई : शेतकरी आत्महत्यांवरून अजित पवार यांनी गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून रोज शेतकरी आत्महत्या घडतायत.रोज 3 ते 4 शेतकरी आत्महत्या होतात, असा आरोप अजित पवार यांनी केलाय. या वर्षी राज्यात भरपूर पाऊस होऊनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय उरतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज सकाळपासूनच दौऱ्यावर निघाले. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. अजित पवार म्हणाले, ‘ एवढा पाऊस पडूनही आत्महत्या करतायत. कारण काय तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीये. काहींचं खरीपाचं पिक गेलं, नंतर रब्बी गेलं. इतरही विविध पिकं, मका वगैरे गेली. ही अवस्था आहे.
एकूणच ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करणं अजित पवारांना टाळलं. हा शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा विषय आहे.पण दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण असतानाही महाराष्ट्रानं ही भाषण ऐकली. कारण दोन नेते काय बोलतात, याचं सर्वांनाच कुतूहल होतं.दोन्हीकडे गर्दी जमली. पण ती कशी होती, कुठून आली होती, हेही सर्वांनी पाहिलं. मीसुद्धा माध्यमांवर हे पाहिल्याचं अजित पवार म्हणाले.