मुंबई APMC मार्केटच्या पुनर्विकासात गणेश नाईकांची एंट्री !
-मुंबई एपीएमसी मसाला मार्केटच्या पुनर्विकासाला खोडा घालणाऱ्यांना नाईकांचे खडेबोल
-मलाई लाटण्यावरून व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधीकडून पुनर्विकासामध्ये रोढा
-पुनर्विकासाचा   प्रोजेकट रिपोर्ट तयार करून मला दाखवा -गणेश नाईक
-इमारतीच्या विकास कामामध्ये जे अडथळा निर्माण करेल त्याचा नकाशा मी बदलनार -नाईक-बैठकीत व्यापारी प्रतिनिधी यांनी मुख्य मुद्दाला बगल दिल्याने नाईक भडकले
-बैठकीत आमदार गणेश नाईक, सभापती अशोक डक ,मार्केट संचालक ,सचिव संदीप देशमुख ,अशोसिएशनचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित 
मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील   सेन्टर फॅसिलिटी   इमारत पालिकेने   धोकादायक म्हणून घोषित केली आहे. या इमारतीच्या पुनर्विकास वरून सध्या व्यापारी आणि एपीएमसी प्रशासन यांच्या मध्ये वाद चालू आहे. त्यासाठी मुंबई APMC प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात अली होती या बैठकीत आमदार गणेश नाईक, सभापती अशोक डक, सचिव संदीप देशमुख, संचालक व्यापारी वाहतूकदार उपस्तिथ होते. या प्रकरणी चर्चेसाठी आमदार गणेश नाईक याना बोलवण्यात आले होते . इमारतीच्या विकासकामामध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याचा नकाशा मी बदलनार असे खडे बोल नाईकांनी सुनावले . 
मसाला मार्केट मधील   सेन्टर फॅसिलिटी इमारत १९९१ साली उभारण्यात आली.   सध्या या इमारतीला अवकळा आली आहे. 
या इमारती मध्ये २७२ गाळे असून त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या इमारतीमध्ये बँक, वाहतूक आणि इत्तर ऑफीस आहेत.इमारत धोकादायक असल्याने ५० टक्के ऑफिस रिकामी करण्यात आली आहे .या इमारतीला पुनर्बांधणी साठी एपीएमसी प्रशासन व गाळेधारक मध्ये बऱ्याच बैठक होऊन सुद्धा आता पर्यंत काही फलित निघाले नव्हता गाळे   धारकयांचे म्हणण्यानुसार   APMC प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तर काही व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी   मलिदा मिळण्यासाठी खोडा घालत आहेत .त्यामुळे काही गाळे धारकांनी या इमारतीच्या पूणर्वंधणीसाठी आमदार गणेश नाईक कडे दाद मागितले होते.त्यामुळे   ३१ मे रोजी मुंबई APMC सभागृहात चर्चेचे आयोजन करण्यात आले होते या चर्च्यात आमदार गणेश नाईक मुख्य पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी मसाला मार्केटचे व्यापारी कीर्ती राणा यांनी आपली बाजू मांडताना मार्केट प्रशासन विरोधात भूमिका मांडली. मार्केटच्या बांधणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, आमची कोणतीच बाजू ऐकून घेतली जात नाही.   तसेच यावेळी राणा यांनी FSI चा मुद्दा उकरून काढला. त्यामुळे प्रकरण भरकटत जात असल्याचे पाहता आमदार गणेश नाईक यांनी यावेळी व्यापाऱ्यांना   खडे बोल सुनावले . आम्ही राज्याचे जवाबदार विशवस्त असून मार्केटचा पुनर्विकास योग्य झाला पाहिजे याची आम्हाला देखील काळजी आहे. जो कोणी यामध्ये येईल त्याचा नकाशा आम्ही बदलून काढू.असे बोलून त्यांनी या पुनर्विकासामध्ये फूट घालणाऱ्यांना धमकीवजा इशारा दिला. तसेच यावेळी मार्केटचा   विकास सर्वजण मिळून करू या यामध्ये जे काही लागणार मी पूर्णपणे सहयोग करणार, असे नाईक यांनी सांगितले . सभापती, सचिव, सर्व संचालक, बाजार घटक आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांनी १५ दिवसात प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि मला बोलवा असे यावेळी नाईक यांनी सांगितले .