ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; पुढच्या वर्षीपासून काटामारी बंद; सरकारचा नेमका निर्णय काय..?
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षीपासून काटामारी बंद सरकारचा नेमका निर्णय काय..?
पुणेः गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यामधून ऊस वजन करताना कारखानदारांकडून काटामारी केली जात आहे. त्याचा फटका ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ऊस उत्पादकांची कारखानादारांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्यानेच साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा ऊस ज्यावेळी वजन करण्यासाठी वजनकाट्यावर ठेवला जातो त्यावेळी दोन ते अडीच टनाचा काटा मारला जातो.
त्यामुळे कारखान्यांचे वजन काटे डिजिटल करण्यासाठी आम्ही आंदोलन केले असल्याचेही माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.  
वजन काट्यावर अडीच टनाचा काटा मारला जात असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही वाढला असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून साखर कारखान्यावरील वजन काटे हे डिजिटल करणार असल्याचे सरकाकडून सांगण्यात आले आहे .
मागील वर्षी साखर कारखान्यावरील काटामारीमुळे साडे चार हजार कोटीची साखर तयार झाली आहे. त्यामुळे वर्षाला दोनशे दरोडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर साडेचर हजार कोटीचा दरोडा घालतात अशी जाहीर टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यावरील वजन काटे डिजिटल करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन पुकारले गेले होते असेही यावेळी सांगितले.
साखर कारखानदारांच्या काटामारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
मात्र त्याचा फायदा कारखानदार घेत असल्यानेच कारखान्यावर असलेले वजन काटे डिजिटल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने जर साखर कारखान्यावरील वजनकाटे डिजिटल केले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असल्याचेही राजू शेट्टी यांनीम मत व्यक्त केले आहे.