महविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिंदे, फडणवीस, मनसे यांची महायुती!
महविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिंदे, फडणवीस, मनसे यांची महायुती!
नवी मुंबई : निवडणूक जवळ आल्यावर पाहायला मिळते विविध पक्षांची गटबाजी आधी एकमेकांवर टीका करत शब्दांचा हल्लाबोल करायचा आणि निवडणूक जवळ आल्या एकमेकांना साथ देत गटबाजी सुरु करायची. सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी मनसे , भाजप   आणि शिंदे गटाची युती होणार का? यावर शिंदे गट, मनसे आणि भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र आता याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक असं विधान केलं आहे. आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य अनौपचारिक गप्पांवेळी केलं आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दिपोत्सव या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील तीन मोठे नेते एकत्र दिसले होते. तेव्हापासून महायुतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची महायुती होणार असल्याचा   अंदाज बांधला जात आहे.   आधी टीका करत राहायचं पण निवडणूक जवळ आली कि समविचारी म्हणून संबोधून कार्यकर्त्यां सोबत सामान्यांचे हाल करायचे. राजकारण सरड्या   सारखं रंग बदलताना पाहायला मिळत आहे यापुढे आणखी नवं काय घडणार या कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.