मुंबई APMC धान्य मार्केटचे व्यापारी कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा नाही तर कारवाई होणारच -आमदार गणेश नाईकांचा व्यापाऱ्यांना इशारा
मुंबई APMC धान्य मार्केटचे व्यापारी कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा नाही तर कारवाई होणारच -आमदार गणेश नाईकांचा व्यापाऱ्यांना इशारा
मुंबई APMC मार्केटमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाचे कारवाई दिखावा
- अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या घरात वयापारी पाठवतात बासमती तांदूळ!
- काही ठराविक व्यपाऱ्याना टार्गेट करून छापे मारण्यात येत आहे
- प्रशासनावर व्यपाऱ्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप
Apmc News Network : नवी मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढ दिवसानिमित्ताने मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची मुख्य संस्था "ग्रोमा" च्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी काही   व्यापाऱ्यांनी आमदारांसमोर आपली गाऱ्हाणी मांडायला सुरुवात केली. मात्र चर्चा विकास कामांवर न करता थेट महापालिका आणि बाजार समितीकडून होणाऱ्या कारवाई वरच सुरु केली. बाजार समिती व महापालिका आमच्यावर जाणून बुजून कारवाई करते .त्यामुले तुम्ही याबाबतीत काहीतरी करा अशी गळ त्यांना घातली. मात्र नाईकांनीही व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन , तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करा नाही तर कारवाई होणारच. चुकीच्या कामात मला खेचू नका. कायद्याने काम कराल तिथे मी तुमच्या पाठीशी उभा राहीन असे असे खडे बोल त्या व्यपाऱ्याना सुनावले.त्यामुले व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. मार्केट आवारात , स्वतः अनधिकृत कामे करायची आणि हि कामे अधिकृत करण्यासाठी आमदार, वरिष्ठ अधिकारी यांना बोलावून त्याच्या हस्ते उदघाटन करायची आणि कामे अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करायचे असे प्रकार सध्या बाजार आवारात सुरु आहेत. त्यामुले   व्यापार्यांबरोंबरच व्यापाऱ्यांच्या संस्थेचेही नाव खराब होत चालले आहे. सध्या मार्केट मध्ये संस्थेच्या सदस्त्यांच्या विरोधात कोणी गेला तर त्याच्या मागे महापालिका आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी लावून त्यांना त्रास देण्याचे प्रकार काही बड्या व्यापारत्यांकडून केले जाते असल्याचीही चर्चा बाजार आवारात सुरु आहे.  
बाजारातील व्यापाऱ्यांकडून, आप आपल्या गोदामात पत्राची शेड टाकण्यासाठी थोडी फार बांधकाम करण्यात येत आहे मात्र काही वयापारी आम्ही ग्रोमा   संस्थांच्या सदस्य आहोत आणि आमचे कोणी वाकड करू शकत नाही ,आमच्या कडे अन्न औषध प्रशासन विभागाचे मोठे अधिकारी,मंत्री ,आमदार आणि खासदार आहेत.या लोकांच्या घरात आम्ही बासमती तांदूळ आणि कडधान्य पाठवतात त्यामुळे आमचे संपर्कात खासकरून अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आहे जेकोणी आमचे   नादात लागणार त्याच्या गोदामात छापे टाकण्यात येणार आहे, आम्ही जे ठरवणार तेच होणार असे भाष्य   करून मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना दाबून ठेवला जात आहे.असेच एक घटना J विंग मध्ये घडले होते व्यापार   सुरु असताना   गोदामावर जवळपास अन्न औषध प्रशासन अधिकारीचे १० ते १२ कर्मचारी अचानकपणे दाखल झाले आणि गोदामात काही कडधान्य सील केले   होते, सगळे पेपर OK असताना त्यांना त्रास देण्यात काम या अधिकाऱ्याकडून करण्यात आला होता असे व्यपाऱ्याने सांगितलं होते असेच अनेक घटना आहेत   कोणी या संगठनेच्या वाहेर जाउन कामेकेला आणि आवाज उठवला तर त्याच्या   मागे अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी लाउन त्यांना त्रास दिला जातो , असे चर्चा धान्य मार्केटचे व्यपऱ्यामध्ये होत आहे.संस्थाचे पदाधिकारी कुठल्याही सिमीनार झाली कि म्हणतात आमचे संस्था १२८ साल पुराणी संस्था आहे मात्र या संस्थांच्या नावाने काही सदस्य गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे या संस्थामध्ये काम करणाऱ्या वऱ्याच सदस्य चांगलं काम करतात मात्र काही सदस्यांमुळे संस्थांच्या कथनी व करनी वर शंका निर्माण होऊ लागली आहे. संस्थांच्या नावाखाली स्वतः उलट सुलट कामे करतात   दुसरे कोणी विरीधात गेले कि त्याच्या विरोधात सगळे एकत्र येऊन   अधिकारी आणि व्यपाऱ्यावर दबाब टाकतात त्यामुळे १२८ साली बनवण्यात आलेल्या या संस्थे मध्ये पहिले जे काम होतो आता ते राहिले नाही संस्था फक्त दिखावा आहे असे काही वयापारी आणि दलाल सांगतात .