वर्क ऑर्डर नसताना APMC धान्य मार्केटचे रस्ते, ड्रेनेज लाईनचे भूमीपूजन कसे?
वर्क ऑर्डर नसताना   APMC धान्य मार्केटचे रस्ते ,ड्रेनेज लाईनचे   भूमीपूजन कसे ?
- धान्य मार्केटमध्ये रस्ते ,गटार लाईनचे कामाची भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात
- सदर कामाचे निविदांची   चौकशी व्हावी म्हणून संचालक मुख्यमंत्री व पणन संचालक कडे केले तक्रार .
- पहिला भूमिपूजन ,नंतर इ निविदा मंजुरी, हे काय चालले मुंबई Apmc मार्केट मध्ये
नवी मुंबई : मुंबई APMC धान्य मार्केट येथील जवळपास ६ कोटी रुपयाचे विकासकामाचे कोणतेही वर्कऑर्डर व इ निविदा मंजुरी नसताना मार्केट संचालक आणि कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदारांचे हातमिळवणी करून या विकास कामाचे भूमिपूजन केले आहे . त्यामुळे भूमिपूजन करणाऱ्यावर कारवाई करावी ,अशी मागणी मुंबई APMCचे संचालक राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री आणि पणन संचालक कडे केली आहे, त्यामुळे धान्य मार्केटच्या उप अभियंता व कार्यकारी अभियंताच्या भ्रष्ट कारभाराबाबत बाजार घटकामध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
गुरुवारी मुंबई Apmc   प्रशाकीय इमारती मध्ये सदस्य समितीच्या बैठक पार पडला   या बैठकीसाठी   संचालकांना   देण्यात आलेल्या विकासकामांचे अजेंडा मधील जे कामे होते त्याची चर्चा झाली, मात्र या अजेंडा मध्ये धान्य मार्केटचे जवळपास ६ कोटी रुपयेची रस्ते ,ड्रेनेजलाईन व कांक्रीटकरण करण्याचे   कामाची   इ निविदा मंजुरीच्या विषय न घेता ऐत्यावेळीच्या विषय घेयून काही संचालक हजर नसताना हे कामे मंजूर करण्यात आला.याबाबत मुंबई APMC चे संचालक राजेंद्र पाटील यांनी सांगितले कि जे मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली त्याच्या कडे तांत्रिक पेपर निविदा प्रमाणे उपलब्ध नसताना हि चुकीची मंजुरी देण्यात आली आहे ,इ निविदाच्या मंजुरीच्या अगोदर भूमिपूजन ,संचालक यांच्या अजेंडा मध्ये सादर विषय न घेता आयत्या वेळी हि बिषय मंजुरी करण्यात आले ,त्यामूले या निविदात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे . सदर प्रकरण गंभीर असून यावर चौकशी होण्याची गरजेचे आहे.
मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये ४ दिवसापूर्वी मार्केट संचालक ,कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदार आणि व्यपाऱ्याना सोबत घेउन   विकासकामांच्या नावाखाली इ निविदा मंजूर झाल्यचे सांगुन कामाचे नारियल   फोडून भूमिपूजन करण्यात आला होता , या कामाच्या कुठल्याही वर्क ऑर्डर नसताना भूमिपूजन कसे काय करण्यात आली या मध्ये मोठा भ्रस्टाचार दिसून येत आहे त्यामुळे सदर कामाचे चौकशी करून संबंधीत अधिकारी यांच्च्यावर लवकरात कारवाई करावी असे मागणी   पाटील यांनी केली   आहे . नवीन कारभार सांभाळले सचिव राजेश भुसारी यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे .