टोमॅटो दरात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधान
या वर्षी टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे. मागील काही दिवसात टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देणे पसंत केल्याने रस्त्यांवर टोमॅटोचा लाल चिखल पाहिला मिळाला होता.
परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर शेती पिकांसोबतच टोमॅटो पिकाचे ही नुकसान झाले. त्यामुळे पुढील काळात पुरवठा आणि मागणी हे प्रमाण विस्कळीत झाल्यामुळे दक्षिण भारतातील बऱ्याच भागात टोमॅटोच्या दरात फार मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दक्षिण भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
परंतु जर आपण उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर तेथे काही भागांमध्ये टोमॅटो किमतीत काही प्रमाणात घट पाहायला मिळाली. सोमवारी उत्तर प्रदेश मध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव ३० ते ४० रुपये प्रति किलोच्या दरम्यान होते. तर पश्चिम विभागात टोमॅटोचा किरकोळ दर सोमवारी ३० ते ८५ रुपये प्रति किलोच्या दरम्यान राहिला.
तसेच पूर्वेकडील भागात टोमॅटोचे दर ३९ ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत पाहायला मिळाले. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय टोमॅटोचे सरासरी मॉडेल किंमत पाहिली तर ती साठ रुपये प्रति किलो होती. स्पोर्ट ब्लेअर मध्ये टोमॅटोचा भाव १२७ रुपये किलो तर केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये एकशे पंचवीस रुपये प्रति किलो तसेच पलक्कड आणि वायनाड मध्ये १०५ रुपये प्रति किलो, कोझीकोड मध्ये ९१ रुपये आणि कोट्टायम मध्ये ८३ रुपये प्रति किलो दर होता.
कर्नाटक राज्यातील मंगळुरू आणि तुमकूर या मोठ्या शहरांमध्ये सोमवारी टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोच्या पातळीवर राहिले. धारवाड मध्ये टोमॅटोचा भाव 75 रुपये किलो आणि मैसूर मध्ये 74 रुपये किलो होता. कर्नाटकातील शिमोगा मध्ये 67 रुपये तर बेंगळुरूमध्ये 57 रुपये किलो होता. तामिळनाडूमधील सोमवारी टोमॅटोच्या भावाचा विचार केला तर रामनाथपुरम मध्ये एकशे दोन रुपये प्रति किलो तर चेन्नई मध्ये चारशे रुपये प्रति किलो होता.( संदर्भ-वेबदुनिया)