मुंबई APMC फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंद दाखल,भाव स्वस्त
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंद दाखल,भाव स्वस्त
- इराणी सफरचंद मुळे   काश्मीर आणि किन्नर सफरचंदाची दारात होणार मोठा घसरण
- इराणी सफरचंद ८० ते १०० तर काश्मीर सफरचंद ६० ते ८० रुपये प्रतिकिलो
- घाऊक बाजारात इराणी ,टर्की आणि न्यूजलॅंडची सफरचंद सुरु
- सफरचंद खायला गोड रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक त्यामुळे परदेशाच्या सफरचंदाची मागणी वाढली असून काश्मीर सफरचंद पडून.
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंदांची आवक आज पासून सुरु झाली असून काश्मीर सफरचंद मात्र विक्री विना पडून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. इराणी सफरचंद ८० ते १०० रुपये प्रति किलो तर काश्मिरी सफरचंद   ६० ते ८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. मात्र, असे असताना इराणी सफरचंदला अधिक मागणी असून काश्मिरी सफरचंद मार्केटमध्ये विक्रीविना पडून असल्याची माहिती फळ मार्केटचे व्यापारी शिव कुमार यांनी सांगितले आहे .
फळ मार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम
मुंबई APMC   फळ मार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इराण आणि टर्की   येथून सफरचंद बाजारात दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर मागणी असते. सध्या बाजारात इराणी सफरचंदाला मागणी आहे. किरकोळ बाजारात इराणी सफरचंदाला दर्जानुसार 120 ते 180 रुपये किलो भाव मिळत आहे. डिसेंबर ते मार्च दरम्यान परदेशी फळांचा हंगाम असतो.