गूळ शेंगदाण्याचे भाव वाढलॆ, तिळाच्या दरात घसरण
गूळ शेंगदाण्याचे भाव वाढलॆ तिळाच्या दरात घसरण
- सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- मुंबई APMC मसाला मार्केट मध्ये तिळगुळ साहित्याची आवक वाढली
- दिवसात   मार्केटमधून ५ ते ६ गुळाच्या ट्रकची   विक्री
नवी मुंबई : मकर संक्रांत काही दिवसांवर आली असल्याने बाजारात आता तीळ गुळाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबई APMC   मसाला मार्केट मध्ये तीळ, शेंगदाणे आणि गुळाची आवक वाढली आहे. दरवर्षीच्या मानाने यावर्षी गुळ आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ   झालेली पाहायला मिळत आहे. मात्र तिळाच्या दरात   घसरण झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यावेळी तिळगुळाचे साहित्य खरेदी करताना समतोल साधता येणार आहे.
सध्या साखर ऐवजी लोक गोड म्हणून गुळाचा वापर जास्त करू लागले आहेत त्यामुळे गुळाचे दर काही महिने वाढलेलेच आहेत. त्यातच मकर संक्रातीचा भर पडल्याने, गुळाच्या दरात किलोमागे   ५ ते ७ रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे गूळ ४५ ते ५० रु किलो होता ते आता ६० ते ७० रु किलो झाला आहे. तेलाचे दर वाढल्यापासून शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेंगदाणे १४० ते १४५ रु किलो झाले होते आता शेंगदाणे १५० रु किलो झाले आहेत. तिळाच्या दराने मात्र सर्व सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. त्यामुले गेल्या वर्षी अगदी २०० ते २२० रु किलो पर्यंत पोहचलेले तीळ आता मात्र १७५ ते १९० रु किलो घाऊक बाजारात झाले आहे. त्यामुळे तिळगुळाचे साहित्य खरेदी करताना सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
 
तीळ,शेंगदाणा आणि गुळाचे बाजार भाव :
- गूळ पूर्वी   ४५ ते ५०   या वर्षी ४५ ते ५० आणि ६० रुपये किलो
- शेंगदाणा पूर्वी १४० ते १४५ या वर्षी १५० रु किलो
- तीळ पूर्वी   २०० ते २२० रु किलो   आत्ता १७५ ते १९०