बाजार समिती ED च्या रडारवर!
नवी मुंबई : ED च्या कारवाईने राज्यातील राजकारण ढळून निघाले असताना आता राज्यातील श्रीमंत आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीहि सक्तवसुली संचालनालयाच्या {ED} चा रडारवर आली आहे. खुद्द बाजारसमितीचे संचालक असलेले राजेंद्र पाटील यांनीच मागील अनेक वर्षांपासून बाजार समितीचा भ्रष्ट कारभारावर आक्षेप घेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, गैरव्यवहार असा आरोप करत ईडीकडे तक्रार केली आहे.
मागच्या अनेक वर्षात बाजार समितीचा भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित झालेले आहे तसेच पणन संचालक पर्यंत हे तक्रार गेले आहे .बाजार समितीचा स्थापने पासून भ्रस्टाचारत आरोपामुळे APMC चे सभापती ,संचालक ,सचिव आणि अध्यक्ष हि वाचलेले नाही . भ्रस्टाचारचा प्रकरण न्यायालया पर्यंत गेलेले आहे त्यामध्ये काही किरकोळ कारवाई झाली असून मोठा अधिकाऱ्यावर कारवाई झालेले नाही या लोकांनी आता पर्यंत वाचलेले आहे मात्र भ्रस्टाचाराची हि कीड संपूर्णपणे नष्ट होऊ शकलेली नाही आता या भ्रष्ट कारभाराबाबत ED कडे तक्रार केल्याने सर्वांचे धावे दणालले आहेत. आणि बाजार समिती वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. ED चा चौकशीच्या फेऱ्यात कोण अडकेल यांची भित्ती बाजार समिती घटकांना सतावू लागली आहे. पाटील यांनी ईडीला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, घोटाळा झाला आहे ही बाब गांभीर्याने विचारात घेत दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करावी. शासनाचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली व्हावी, अशी मागणी त्यांनी ईडीकडे केली आहे.
- मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना रेडिरेकनरपेक्षा जवळपास ५० टक्के कमी दराने FSI देउन   ६०० रुपये प्रति चौरस मीटर कमी शुल्क आकारण्यात आले यामध्ये बाजार समितीला १३८ कोटी रुपयांची नुकसान  
- बाजार समितीचा विकास कामाचा प्रकल्पात मोठा प्रमाणात भ्रष्टाचार
- मोठ्या रकमेचे कामे काढून प्रत्येक्षात मात्र धातुर मातुर करेल जात आहे
- कंत्राटदाराकडून टक्केवारी घेउन त्याचे बिल पास करण्यात आली आहे
- कोरोना काळात शेतमालाची गाड्या थेट आत आणि वाहेर सोडून मार्केटचे लाखो रुपयांची सेस बुडवले
- भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास १२ हजार बोगस कोड वापरून शासनाची आणि शेतकऱ्याची   कोट्यवधी रुपये सेस बुडवले
- शेतकरी आणि बाजार घटकासाठी जागे न देता एका शिक्षण संस्थेला २० हजार चौरस फुटाची जागे कौडीमूल्य दराने देण्यात आली
- बाजार समिती मध्ये कांक्रीटकरण ,डांबरीकरण आणि ड्रेनेज लाईन कामामध्ये झालेल्या मोठा प्रमाणात भ्रस्टाचार
- फळ मार्केटच्या बहू उद्देशीय इमारतमध्ये बांधकाम घोटाळा, यामध्ये कंत्राटदारांना फायदा पोहचण्यात आली आहे  
आता ED कडे करण्यात आलेल्या तक्रारीमुळे या सर्व कारभारावर सर्वात कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे .