फुलांचे बाजारभाव वाढले दसऱ्याला बाजार भाव कडाडणार APMCच्या परिसरात नागरिकांची फुले खरेदीसाठी गर्दी
फुलांचे बाजारभाव वाढले दसऱ्याला बाजार भाव कडाडणार APMC च्या परिसरात नागरिकांची फुले खरेदीसाठी गर्दी
नवी मुंबई - दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी चांगलाच रंगून गेला आहे. दरम्यान, फूल बाजारातील मागणी वाढल्याने यंदाचा दसरा आनंददायी अशी प्रतिक्रया व्यापाऱ्यांनी दिली आहे. फूल बाजारात फुलांची चांगलीच मागणी वाढली आहे.घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात मोठी लगबग दिसत आहे. नवी मुंबईतील APMC च्या परिसरात झेंडूच्या फुलांना सणासुदीत मागणी असल्याने यंदा दरही सर्वाधिक आहे . झेंडूच्या फुलांना सणासुदीत मागणी असल्याने यंदा दरही सर्वाधिक आहे . बाजरपेठेत नागरिकांनी फुले खरेदीसाठी गर्दी केली आहे . दसऱ्याला झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने पिवळ्या व केशरी रंगाच्या या फुलांची जास्त चलती आहे. ६० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा झेंडू सध्या १०० ते १५० रुपये प्रतिकिलो आहे. गोंडा व आंब्याच्या पानांचे तयार तोरण ८० ते १०० रुपये प्रतिमीटरने विक्री करण्यात येत आहे . बाजारात झेंडूची फूले, तोरणे, आपट्याची पाने, आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे .
'स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून १०० ते १५० रुपये किलो झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे. गेली दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फुलशेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी फुलशेती कोलमडली आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे.असे फुल विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारातील फुल विक्री दर
- झेंडू - १०० ते १५० रुपये किलो
- पांढरी शेवंती - २०० ते २५० रुपये किलो.
- गुलछडी / रजनीगंधा - ३०० ते ४०० रुपये किलो
- गुलाब - प्रती ३० रुपये
- अस्टर - २०० ते २५० रुपये शेकडा.