पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांची हत्या कि आत्महत्या ?
पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांची हत्या कि आत्महत्या ?
नवी मुंबई : राज्यात नक्की चाललंय तरी काय? अचानक होणारे नेत्यांचे अपघात आणि आता राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांची आत्महत्या. मन सुन्न करणारी हि घटना आहे पण नक्की या मागचं कारण काय आहे ? या सगळ्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न अनुउत्तरीतच आहेत. राज्याचे पणण सहसंचालक शशिकांत घोरपडे हे १२ ओक्टोम्बर म्हणजेच बुधवारपासून गायब होते. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या पात्रात त्यानी आत्महत्या केल्याचा संशय होता.त्यासाठी एन डी आर एफ कडून आज शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.एन डी आर एफ चे जवान शशिकांत घोरपडे यांचा पाण्याखाली शोध घेण्याच्या तयारीत असतानाच नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आलय. शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील त्यांच्या कार्यालयातून सातारला जाण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेत सारोळा इथ थांबून त्यांनी आत्महत्या केल्याचे मत स्थानिक पोलिसांनी व्यक्त केले आहे. शशिकांत घोरपडे हे राज्याचे पणन सहसंचालक असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ कुणाच्या दबावामुळे आली कि वयक्तिक कारणांमुळे याचा तापास पोलीस घेत आहेत.