मुंबई APMC मार्केटमध्ये सावकारी विळखा : वसुलीसाठी चालते छळ छावणी
मुंबई APMC मार्केटमध्ये सावकारी विळखा :   वसुलीसाठी चालते छळ छावणी
- मुंबई APMC भाजीपाला आणि फळ मार्केट सावकऱ्याच्या पाशात
- सावकार झोकात आणि कर्जदार कोमात
- मुंबई APMC मार्केट चार लोकांमुळे संपले ,या लोकांवर ED ,CBI आणि आयकर विभाग मार्फत कारवाई करावी
नवी मुंबई : अवैध सावकारीच्या धंद्याचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून,२०१४ मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र मुंबई APMC भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये काही प्रतिष्ठित व्यापारी राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरले आहे .. बाजार आवारात   अवैध सावकारीतून लाखो रुपयांची माया गोळा केला जात   आहेत. नुकतेच एक प्रकरण फळ मार्केटमध्ये घडली आहे यामध्ये फळ मार्केटच्या व्यापाऱ्यांवर हल्ला करण्यात आले असून यामध्ये दोघांमध्ये पैसेही देणंघेणं समोर आले आहे, विशेष म्हणजे या प्रकरणात भाजीपाला मार्केटच्या प्रसिद्ध व्यापारी सोबत   ८ जणांवर APMC पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणावर सोमवारी फळ मार्केटच्या   व्यपाऱ्याने निषेध मोर्चा कडून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी मार्केट संचालक संजय पानसरे यांनी केली होती ,ह्या सगळ्या प्रकरणावर फळ मार्केटचे व्यापारी नारायण शिंदे यांनी APMC NEWS ला सांगितले कि ह्या सगळ्या प्रकरण   राजकारणचा मोठा वाटा आहे . मुंबई APMC   भाजीपाला आणि फळ मार्केट   चार   प्रतिष्ठित व्यपाऱ्यामुळे मार्केटच्या व्यापार संपत आहे . शिंदे यांनी सांगितले कि मार्केट मध्ये आपल्या दलाला   मार्फत सावकरीचे छुपे धंदे सुरू आहे .सावकाराच्या हाती लागलेला कर्जदार म्हणजे बकराच असतो . त्यांनी पुढे म्हणाले कि मुंबई APMC मार्केट मध्ये   ज्या काळात गाळे वाटप करण्यात आले होते   त्यावेळी   मोठ्या प्रमाणात   भ्रष्टचार झाला आहे .   भाजीपाला आणि फळ मार्केट मध्ये आज ८० टक्के वयापारी कर्ज बाजरी मध्ये बुडलेले आहे यांचे जबाबदार चार   लोक आहे ,आता या लोकांच्या आणि त्याचे   नातेवाईकांकडे ८ ते १० गाळे बाजार आवारात   आहे.   ये सगळे सावकारीमुळे आले आहे यावर चौकशी होणे गरजेचे आहे ,आता बाजार समितीच्या गाळ्यांना सोन्याचा भाव आला आहे , सावकारीतून करोडो   रुपये आल्याने छुप्या पद्धतीने   अवैध सावकारी सुरू करून बाजार समितीतील गरीब व्यपाऱ्यासह शेतकऱ्यांना पण लुटलेल्या धंधा सुरु आहे   या लोकांची दफ्तार तपासणी करून केंद्रीय तपास यंत्रणा मार्फत कारवाई करावी   अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली आहे.
फळ मार्केटमध्ये ज्यावेळी आग लागली होती   तेव्हा मार्केट बंद का नाही केले ? खोके वाल्याकडून   पैसे घेऊन त्यांना वसबण्यात आले आणि आता या लोकांना वाहेर काढण्यात आला त्यावेळी सर्व व्यापारी वर्ग शांत का बसला? असे सर्व प्रश्न नारायण शिंदे यांनी व्यक्त केले ..गोरगरिंबांसाठी स्थापन केलेला भाजीपाला आणि फळमार्केटमधे दलालांनी   गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत त्यांचे गाळे विकत घेत ,अनेक प्रतिष्ठित   सावकारांनी ३ ते ५ टक्के व्याजाने पैसे देऊन छुपा धंदा करत गोरगरिबांची कोंडी करून त्यांना कर्जबाजारी केले आहे ..ह्या व्यापारी सावकारांनी मार्केट संपवले असून यांच्यामुळे संपूर्ण मार्केट वेटिस लागले आहे. शासनने बंद केल्या तरी मार्केट मध्ये आज धाडले से सावकारी सुरु आहे ह्या   सावकारी पद्धत संपण्यासाठी   आयकर विभाग, ED आणि CBI मार्फत कारवाई झाली   पाहिजे   , असे नाही झाल्यास या मुठभर लोकांमुळे संपूर्ण मार्केट   व्यापार संपतील अशी गंभीर प्रतिक्रिया फळ मार्केट व्यापारी नारायण शिंदे यांनी केली आहे.
या सगळ्या खासगी सावकारी यंत्रणेचे मार्केटमध्ये   मुठभर सूत्रधार आहेत. त्यांना शासकीय यंत्रणा आणि मोठे मोठे राजकीय नेत्यानी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मार्केटमध्ये शेकडो   जणांवर अत्याचार करीत श्रीमंत झालेल्या सावकारांची छबी त्यांच्या वाढदिवसाला आणि गणेशोत्सवातील स्वागत कमानीवर दिमाखाने झळकत असते. मार्केटमध्ये   सध्या अशाच चार   सावकारांची सध्या जोरदार चर्चा आहे. अलीकडे आपल्या खासगी सावकारीस कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी चक्क पतसंस्था   संस्था ताब्यात घेतल्या आहेत. हे सगळे छळवणूक आणि लुबाडणुकीचे प्रकार समाज उघड्या डोळ्याने पाहत असतो. त्याबाबत अवाक्षरही काढण्याची हिंमत कोणी दाखवत नाही.
भाजीपाला आणि फळ मार्टकेटमध्ये काही   प्रतिष्ठित व्यपाऱ्याने अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांसाठी   मार्केट मध्ये आपल्या दलाल ठेवले आहे ,या दलालानी   गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत   ३ ते ५ टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारीचा धंदा करणाºयांकडून पैसे घेत आहेत. अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते, बाजारसमिती   परिसरातून अनेक जण खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने आपल्या गाळे विकून निघून गेले तर काही गाळे त्याच्या तव्यात असल्याची माहिती शिंदे यांनी दिले आहे.