मुंबई APMC मध्ये प्रशासक नियुक्तीसाठी हालचाली सुरु हिवाळी अधिवेशानंतर निर्णयाची शक्यता!
मुंबई APMC मध्ये प्रशासक नियुक्तीसाठी हालचाली सुरु हिवाळी अधिवेशानंतर निर्णयाची शक्यता!
नवी मुंबई : सध्या मुंबई APMC मधील सभापती पद जाणार कि राहणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. APMC मार्केट मधील १२ शेतकरी प्रतिनिधीमधून ११ जणांची मुदतवाढ संपलेली आहे. यामध्ये सभापती अशोक डक व उप सभापती धनंजय वाडकरयांच्या समावेश आहे .सध्या यावरन्यायालय आणि शासन दरवारी सुनावणी सुरु आहे . सध्या मुंबई APMC मार्केट संचालक व कामगार प्रतिनिधी एकूण ६ आणि शेतकरी प्रतिनिधी १ असे ७ प्रतिनिधी आहेत.   त्यातील २ मार्केट प्रतिनिधी यांना अपात्रतेची सुनावणी पणन संचालक यांच्याकडे आहे. त्यामुळे केवळ ५ प्रतिनिधी उरले आहे . संचालक पद टिकवण्यासाठी   पणन संचालकांनी १२ संचालकांचे कोरम बनवले आहे. त्यामुळे काही प्रमाणात मार्केटमध्ये आपले संचालक पद टिकवण्यासाठी हे प्रतिनिधी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या बाजार समिती सभापती पदासाठी जोरदार संघर्ष सुरु असून 'हम नही तो, कोई नही' असे चित्र बघायला मिळत आहे.  
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच संचालक मंडळ बरखास्त करून शिंदे सरकार प्रशासक नेमणार आहेत. हिवाळी अधिवेशन संपताच याबाबत मोठा निर्णय शिंदे आणि फडणवीस सरकार घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वोच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मुख्यमंत्री आणि पणनमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासक नियुक्तीसाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आणि बाजार समितीच्या फायदासाठी जे मॉडेल तयार केले होते ते दिसून येत आहे.त्यासाठी तारीख पे तारीख दिला जात आहे समजते .   मुंबई APMC मध्ये मार्केटच्या संचालक मंडळ कायमस्वरूपी बरखास्त करून यावर १८ प्रशासकीय आणि कृषी तज्ज्ञ व्यक्तीची निवड करण्याची तयारी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी फडणवीस सरकार कोसळल्याने महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा अजेंडा रद्द करून बाजार समिती निवडणुक लावली आणि संचालक निवडले गेले. या पूर्वी मुंबई APMC सभापती पद टिकवण्यासाठी शिंदे गट, NCP आणि कांग्रेसमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिंदे गटाच्या उमेदवाराला सहकार्य करणार होते. त्यासाठी संबंधित मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धावपळ करत होते. बाजार समितीच्या गैरकारभार बदल एका संचालकांनी ED कडे तक्रार केली असून सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय शिंदे गटाचे काही संचालक राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांना भेटले असल्याची बातमी समोर येत आहे.राजकारणात काही पण होऊ शकतो.