शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई APMC सभापती व उप सभापती ठरले अपयशी!
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई APMC सभापती व उप सभापती   ठरले अपयशी!
- मुंबई apmc मार्केट मध्ये संत्र्यांच्या भावात तफावत.
- सभापती ,उप सभापती आणि संचालक   मंडळ ठरले अपयशी.
- शेतकऱ्यांच्या मालाला कधी मिळेल योग्य हमीभाव?
- समस्या सोडविल्या जात नाही म्हणून शेतकरी चिंतेत.
यंद्याचा पावसामुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून विदर्भ आणि मराठवाडामधील शेतकरी   आत्महत्या करत आहे . विदर्भ मध्ये अतिपावसामुळे संत्र्यांच्या भावात घसरण झाली आहे तर   नागपूर बाजार समिती मध्ये   गेल्या वर्षी १८ ते २० हजार टन ने संत्री   विकला जात होता पण यंदा १० ते १२ हजार टन ने विकला जात आहे   म्हणजेच संत्र १० ते १२ प्रतिकिलो. विदर्भ व   मराठवाडा येथून मोठ्या प्रमाणात   संत्र्यांची आवक मुंबई APMC मार्केट मध्ये झाली आहे. आज मार्केट मध्ये   जवळपास २५०० ते ३००० क्विंटल संत्र्यांची   आवक असून मार्केटमध्ये   ५० ते ६० प्रतिकिलोने विक्री केली जात आहे, मात्र विदर्भ आणि मराठवाडा शेतकऱ्यांना   संत्राच्या भाव   १० ते १२ रुपये प्रतिकिलो मिळतो एवढी तफावत असताना याकडे मुंबई APMC सभापती अशोक डक व त्या भागातून आलेल्या   संचालक मंडळाला कामातून अपयश मिळताना दिसत आहे . विदर्भ   आणि   मराठवाड्यातील अनेक शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करत असतात   पण दुसरीकडे याच शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेले हे   संचालक मंडळ मुंबई APMC मध्ये येऊन दुसऱ्या कामात व्यस्त राहून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे   दुर्लक्ष करताना दिसत आहे.संचालक मंडळ शेतकऱ्याच्या अडी अडचणी सोडवण्याकरिता असतो पण   मार्केट मध्ये येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला   योग्य हमीभाव मिळवून देण्याकरिता संचालक मंडळ काहीही करत नसल्याने शेतकरी आत्महत्याला बळी पडतोय. हे संचालक मंडळ गेल्या दोन वर्षांपासून येथे काम करत असल्याचं भासवलं जात पण अद्याप कोणतंही धोरण हाती घेतलं नाहीये सध्या शेतकरी   आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी मार्केटची मालमत्ता विक्री करण्याच्या प्रयत्नात संचालक मंडळ व्यस्त आहेत .