मुंबई APMC सभापती पदावर रशिखेच, लवकरच येणार नवीन सभापती!
मुंबई APMC सभापती पदावर रशिखेच, लवकरच येणार नवीन सभापती!
- सभापती पदावर शिंदे गटाचा डोळा तर पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस झाले गोळा.
- मुंबई APMCवर ६ वर्षांनंतर सभापती आले मात्र कामे शून्य!  
नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड झाल्यावर शेतकरी, कर्मचारी, माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठवली, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र संचालक मंडळ अस्तित्वात येऊन जवळपास ३ वर्ष झाली असून मार्केटमध्ये रखडलेले विकासकामे सोडून संचालक मंडळ दुसऱ्या कामात व्यस्त दिसले . मार्केटमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न सहा वर्षांपासून प्रलंबित होते आणि मार्केटची स्थिती अत्यंत दयनीय होते, मार्केट मध्ये सभापती अशोक डक, उप सभापती धनंजय वाडकर व सर्व संचालक मंडळ पाहणी दौरा करून दोन वर्ष झाले एकही कामे झाली नाही. त्यामुळे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून संचालक GO BACK नारे लावले, सभापती अशोक डक आणि उप सभापती ज्यावेळी पदभार स्वीकारले त्यावेळी सांगितले होते कि मार्केटमधील येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला हमीभाव, नवीन मार्केटमध्ये गाळावाटप, शीतगृह चालविणे, मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार बंद करणे, नियोजन शून्य अभियंत्याने बांधून ठेवलेले जवळपास १५० कोटीच्या प्रकल्पला लवकरात लवकर मार्गी लावणे, राज्यात शेतकऱ्यांसाठी कोल्डस्टोरेज बांधणे, १८ वर्षांपासून रखडलेले कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी ही सर्व कामे मार्गी लावता येणार असे सांगितले. त्यामुळे बाजारघटकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र एकही काम झाली नाही. त्यामुळे बाजारघटक संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी करत आहे आणि चांगले प्रशासक नियुक्ती करा.   ज्यामुळे शेतकऱ्यांची   होणारी फसवणूक आणि बाजारघटकाचे चांगले दिवस येईल. दुसरीकडे मागील १५ दिवसापासून सभापती अशोक डक मुंबई APMC मध्ये   येत नसल्याने येणाऱ्या काळात पात्र झालेले संचालक मंडळ बाजार समितीच्या सभापती पदासाठी आपला उमेदवार उभे करणार शिवाय काही संचालकांनी सभापती पदासाठी फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांना बोलावून बैठक सुरु केली आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे ज्या शेतकरी प्रतिनिधी आणि बाजार समितीच्या प्रतिनिधी मध्ये द्वंद्व होत आहेत. ते पण दूर कराण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी प्रयत्न करत आहे. सभापती पदासाठी काही पण करणार असे दिसून येत आहे, तर दुसरीकडे सभापतींनी आपले पद आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी दिवसरात्र धावपळ करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसात सभापती अशोक डक यांचे माजलगाव बाजार समिती मध्ये कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे हे कसे रोखणार याकडे सगळे लोकांची लक्ष्य आहे. मात्र राजकारणात काहीही घडू शकते याचे अनेक दाखले ताजे आहेत.  
मुंबई एपीएमसीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या ७ संचालकांचे संचालक पद पणन संचालक यांनी रद्द केल्यांनतर शासन दरबारी आणि मंत्राच्या संपर्कामध्ये गेल्या पांच महिन्यापासून आपल्या पद पुन्हा बाजार समिती मध्ये राहावे म्हणून प्रयत्न करत होते. महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन पणनमंत्री बाळासाहेब पाटील असतानाही राष्ट्रवादी आणि कांग्रेसचे ७ संचालकांना त्याचे पदे मिळाली नाही. त्यामुळे सर्व संचालक मंडळ निराश झाले होते. त्याच दरम्यान आघाडी सरकार कोसळले, पाच महिन्यापासून विविध खात्याचे मंत्री आणि   शासन दरबारी जाऊन सुद्धा कोणी पात्रता केली नव्हती. राज्यात ED सरकार आले आणि   ७ अपात्र संचालकांच्या पदावर स्थगिती दिले. त्यामुळे बाजारसमिती मध्ये शिंदे सेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस यांची आघाडी झाल्याचे बोलले जात आहे. सूत्राने सांगितले प्रमाणे या सर्व संचालकांना अपात्रतून पात्रता साठी काही अटी शर्ती देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पात्रतेसाठी स्थगिती आदेश काढण्यात आले. सूत्राने सांगितले प्रमाणे येणाऱ्या काही दिवसात सर्व संचालक मंडळ शिंदे सेना गटात शामिल होणार आणि सर्व बाजार समितीमध्ये शिंदे सेनेला मजबुती करण्यासाठी कामाला लागणार. राष्ट्रवादी आणि कांग्रेसच्या संचालकांना मदत करण्यासाठी   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावून आले त्यामुळे APMC मध्ये शिंदे सेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस मध्ये महागठबंधन झाल्याची चर्चा बाजार आवारात जोरात सुरु झाली आहे