मुंबई APMCचे अभियंता मेहबूब बेपारी खोटी अनुभव प्रमाणपत्र दाखून लाटल्या सरकारी नोकऱ्या
  कोर्टानी उपअभियंता मेहबूब वेपारी व इतर दोन अधिकाऱ्यावर केला फौजदारी गुन्हा दाखल    
बोगस अनुभव प्रमाणपत्र दाखवून मुंबई APMC मार्केटमध्ये नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मुंबई एपीएमसीत अभियंता   मेहबूब बेपारि यांनी   आपला वडिलांची बोगस कंपनीच्या नावाने ३ वर्ष्याचा अनुभव प्रमाणपत्र सादर करून खोटी माहिती सांगून याच प्रमाणपत्राच्या आधारे   वेपारी यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कनिष्ठ अभियंत्याची नोकरी मध्ये लागली होती ,पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला होता मात्र   ऍड. संतोष यादव यांच्या तक्रारीनंतर आरोपीचं बिंग फुटलं. याप्रकरणी वाशी कोर्टानी भरती कायद्याच्या उल्लंघन करून फर्जी अनुभव प्रमाणपत्र साहयाने मुंबई एपीएमसी मध्ये कनिष्ठ अभियंता आताचे उपअभियंता मेहबूब   बेपारी ,तत्कालीन पणन संचालक बी . डी पवार व तत्कालीन सचिव व सेवानिवृत्त आयएस अधिकारी नंदकुमार जंत्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे .मात्र, बोगस अभियंतावर   कारवाई करण्याऐवजी त्यांची नोकरी वाचवण्यासाठी खटाटोप सुरु असल्याचं दिसून येत आहे.नोंदणी नसणाऱ्या अनुभव प्रमाणपत्र देउन २० वर्ष दोन पदावर काम पाहणाऱ्या मेहबूब वेपारी या अभियंत्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते अशी माहिती ऍड. संतोष यादव यांनी दिली. तर सध्या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठे बोगस अभियंता हाताळत असल्याचे   बोलले जात आहे. बाजार समिती प्रशासन काय कारवाई करणार याकडे   सर्वांचे लक्ष्य   लागली आहे.  
 
मुंबई एपीएमसीच्या उप अभियंता मेहबूब वेपारी यांनी भरती कायद्याचं उल्लंघण करून फर्जी अनुभव पत्र आणि फर्जी दस्तऐवज हे खोटे कागदपत्रे देऊन कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती करून घेतली होती. उपअभियंता मेहबूब वेपारी यांच्यावर वाशी न्यायालयाने   420, 467, 468, या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून एपीएमसी पोलीस ठाण्यात पूर्ण तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिले होते.एपीएमसी पोलिसांनी आपल्या चौकशी अहवाल कोर्टाला सादर केला असून यामध्ये वऱ्याच धक्कादायक माहिती समोर आली आहे ,पोलिसांनी आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे कि कनिष्ठ अभियंता पदासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कडून दि. ०६/०६/१९९७ रोजी दैनीक सामना या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवून मुलाखती घेण्यात आला . कनिष्ठ अभियंता पदासाठी या पदासाठी बी.ई. (सिव्हील) पदवीधर उमेदवार ती परिक्षा किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला असावा व त्यास कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा किंवा तो पदवीकाधारक असल्यास त्यास किमान ४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मेहबूब कासीमअली बेपारी हे अभियांत्रीकी स्नातक (स्थापत्य) ही पदवी क्रमांक ९६-बीईएनजी–१२५ ही पदवी घेवून नोव्हेंबर-१९९५ मध्ये उत्तीर्ण (पास क्लास) श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मेहबूब बेपारी यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेकडे कनिष्ठ अभियंता या पदासाठी केलेले अर्जावर कोणतीही तारीख नमुद केलेली नसल्यामुळे सदरचा अर्ज कधी केलेला आहे याबाबत माहिती मिळत नाही. महेबूब बेपारी यांनी अर्ज सादर करताना मेसर्स पुनम कन्सट्रक्शन, ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स, ४९/बी, शिवाजी. नगर, वाशी नाका, मेहुल रोड, चेंबूर, मुंबई - ७४, संपर्क कं. ०२२-२५५६९१७४ या फर्मचे कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते . सदरचे तीन वर्षाचा काम करण्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र दि. ०५/०४/१९९७ रोजी मेसर्स पुनम कन्सट्रक्शन,ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स यांचेकडून देण्यात आलेले असुन सदरचे प्रमाणपत्र मेहबूब बेपारी यांनी पदासाठी अर्ज सादर करताना कागदपत्र सोबत जोडलेले आहे. मेहबुब   बेपारी नोव्हेंबर १९९५ साली पास झाले असुन त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे जाहीरतीमध्ये दिल्याप्रमाणे नोव्हेंबर १९९८ नंतरचे प्रमाणपत्र आवश्यक असताना एप्रिल १९९७. चे प्रमाणपत्र जोडलेले आहे. यावरुन त्यांना तीन वर्षाचा अनुभव नसल्याचे निदर्शनास आली आहे .तसेच कनिष्ठ अभियंता पदासाठी या पदासाठी बी.ई. (सिव्हील) पदवीधर उमेदवार ती परिक्षा किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला असावा व त्यास कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा किंवा तो पदवीकाधारक असल्यास त्यास किमान ४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मेहबूब कासीमअली बेपारी हे उत्तीर्ण श्रेणी ( पास क्लास ) या श्रेणीतुन उत्तीर्ण झालेले असुन, त्यांना कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्ती देण्यात आलेली आहे.तसेच मेहबूब बेपारी यांनी मेसर्स पुनम्न कन्सट्रक्शन ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स, ४९/बी, शिवाजी नगर, वाशी नाका, मेहुल रोड, चेंबूर, मुंबई - ७४, संपर्क क. ०२२-२५५६९१७४ या फर्मचे अनुभव प्रमाणपत्र कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज सादर करताना जोडले आहे. मेसर्स पुनम कन्सट्रक्शन, ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स ही फर्म मेहबूब बेपारी यांचे वडील कासीमअली मैनुद्दीनसाहब बेपारी यांची असुन, सदर कंपनीचे नोंदणी संदर्भात प्रभारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, ( संनियंत्रण नोंदणी ) कक्ष, मुंबई महानगरपालीका यांचेशी पत्रव्यवहार करुन माहिती प्राप्त केली असता मेसर्स पुनम कन्सट्रक्शन, ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स ही फर्म नोंदणीकृत ( रजिस्टर ) नसल्याचे संबंधीत कार्यालयाकडून संदर्भ क. NO.EE / M& R / 059/CIV/ILDATED-02/07/2020 अन्वये लेखी पत्राव्दारे कळवीले आहे. मेहबूब बेपारी यांनी त्यांचे वडील नामे कासीमअली मैनुद्दीनसाहब्य बेपारी यांची मेसर्स पुनम कन्सट्रक्शन, ग्रुप ऑफ इंजिनीयर्स अॅण्ड कॉन्टॅक्ट्रर्स ही कंपनी रजिस्टर नसतानासुध्दा मेहबूब बेपारी यांनी वडीलांकडून अनुभव प्रमाणपत्र घेवून सादर केले . परंतू सदरची कंपनी रजिस्टर नसल्यामुळे मेहबूब बेपारी यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र अवैध असल्याचे दिसुन येत आहे.तसेच   मेहबूब कासीमअली बेपारी यांची कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरातीमध्ये नमुद केलेली पात्रता मेहबूब बेपारी यांनी धारन केलेली नाही. तरी त्यांची सदर पदावर निवड झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत आहे. असे अहवाल एपीएमसी पोलिसांनी वाशी कोर्टात सादर केली आहे .
-मुंबई APMCचे अभियंता मेहबूब बेपारी खोटी अनुभव प्रमाणपत्र दाखून लाटल्या सरकारी नोकऱ्या
-वाशी कोर्टानी मुंबई APMCचे   उपअभियंता मेहबूब वेपारी व इतर दोन अधिकाऱ्यावर केला फौजदारी गुन्हा दाखल    
-बोगस अनुभव प्रमाणपत्रच्या साह्याने   २० वर्षांपासून कामाला
-मेहबूब बेपारि आपल्या वडिलांच बोगस कंपनीच्या नावाने ३ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र केला सादर
-बोगस अभियंतावर   कारवाई करण्याऐवजी त्यांची नोकरी वाचवण्यासाठी खटाटोप सुरु
-बाजार समिती प्रशासन काय कारवाई करणार याकडे   सर्वांचे लक्ष्य .  
-मेहबूब कासीमअली बेपारी यांची कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरातीमध्ये नमुद केलेली पात्रता धारन केलेली नाही.
- त्यांची सदर पदावर निवड झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत आहे.
-असे अहवाल एपीएमसी पोलिसांनी वाशी कोर्टात सादर केली आहे .
▪️बोगस अभियंत्यामुळे बाजार समितीचे वाटोळे!
▪️आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ अकुशल अभियंत्यांच्या खांद्यावर
▪️प्रकल्पाचा निधी पाच पटीने वाढवून करोडो रुपयांचा भ्रष्टचार